शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मानेवड्यातील एस. के. बारमध्ये पोलिसांचा छापा

By admin | Updated: July 16, 2017 10:00 IST

बाहेरून बंद आणि आतमध्ये सुरू असलेल्या पुनह एका बियर बारवर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा घातला.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 16 - बाहेरून बंद आणि आतमध्ये सुरू असलेल्या पुनह एका बियर बारवर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा घातला. सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी स्वत:च मानेवाड्यातील या बारमध्ये छापा घालून कारवाई केली. त्यामुळे मालकासह मद्यपींच्याही तोंडचे पाणी पळाले. मानेवाडा रिंग रोड चौकात एस.के. बियर बार आहे. विलास मानिकराव करांगळे हे या बारचे मालक असून ते भाजपा दक्षीण नागपूरचे महामंत्री आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील महामार्गापासून ५०० मिटर आत असलेल्या बियर बारमध्ये मद्य विक्रीला प्रतिबंध करण्यात आला. त्यानुसार उपराजधानीतील महामार्गालतच्या अनेक बियर बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील लावले. असे असतानाही उपराजधानीतील अनेक बारमध्ये बिनबोभाट ग्राहकांना मद्य विकले जात आहे. मानेवाड्यातील एस. के. बारमध्ये अशाच प्रकारे ग्राहकांना मद्य विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन दिवस शहानिशा केल्यानंतर गुन्हे शाखेचे एसीपी वाघचौरे यांनी आपल्या पथकासह शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास या बारमध्ये छापा घातला. यावेळी तेथे रेस्टॉरंटच्या नावाखाली ग्राहकांना मद्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळले. हा बार भाजपा पदाधिका-याचा असल्याची कल्पना असल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण कारवाईचा व्हीडिओ तयार केला आहे. या कारवाईमुळे बार मालकासोबतच मद्यपींचेही धाबे दणाणले. करांगळेंच्या बारवर धाड पडल्याचे वृत्त पसरताच रिंग रोडवरील बार मालकांमध्ये एकच खळबळ उडाली. बारमालकाने फोडले सील सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिबंधानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारमध्ये ठेवलेली दारू एका खोलीत ठेवून त्या खोलीला सील केले होते. बारमालकाने त्या सीलमधून एक असे छिद्र केले की ते चावी लावून कुलूप उघडता येत होते. या रूममध्ये नियमित मद्य ठेवून आणि तेथील मद्य काढून ते ग्राहकांना विकले जात होते. हा प्रकार पाहून पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांना माहिती देऊन कारवाईच्या ठिकाणी बोलवून घेतले. दरम्यान, या बारमध्ये वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरू होती. त्यामुळे तेथे नेमका कोणता अन् किती रुपयांचा मद्यसाठा मिळाला, ते स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, येथे असलेला मद्यसाठा आणि साहित्याची किंमत लाखो रुपयांत जाईल, अशी माहिती एसीपी वाघचौरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.महिनाभरात चवथी कारवाई बाहेरून बंद आणि आतमध्ये सुरू असलेल्या बारमध्ये पोलिसांनी छापा घालण्याची महिनाभरातील ही चवथी कारवाई आहे. यापूर्वी धंतोलीतील निडोज बारमध्ये जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा घालण्यात आला होता. नंतर पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी सदरमधील हेरिटेज बारमध्ये छापा घातला. त्यानंतर पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांनी कामठी मार्गावरील वेलकम बारमध्ये छापा घालून कारवाई केली. या तीन ह्यबंद बियर बारह्णमध्ये छापा घालून पोलिसांनी मोठा मद्यसाठा जप्त केला आहे. आता एस. के. बारमध्ये छापा घालून पोलिसांनी खळबळ उडवून दिली आहे.