शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

निधी वळविण्यासाठी मंत्रालयात धावपळ

By admin | Updated: March 30, 2017 03:39 IST

आमच्या खात्यातील एका योजनेचा निधी दुसऱ्या योजनेत वळवण्याची परवानगी द्या, यासाठी विविध विभागांच्या

यदु जोशी / मुंबई आमच्या खात्यातील एका योजनेचा निधी दुसऱ्या योजनेत वळवण्याची परवानगी द्या, यासाठी विविध विभागांच्या असंख्य फायलींचा वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर सध्या खच पडला आहे. यानिमित्ताने या विभागांची वित्तीय बेशिस्त तसेच मनमानीही समोर आली आहे. राज्यात सहा महिने ते सहा वर्षे वयाची बालके आणि स्तनदा मातांना पुरविण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहार योजनेचे तब्बल ६३० कोटी रुपये वित्त विभागात अडले आहेत. राज्यातील जवळपास एक हजार महिला बचत गटांकडून हा पूरक आहार पुरविला जातो. गेले आठ महिने पैसाच न मिळाल्याने त्यांच्यावर व्यवसाय बंद करण्याची पाळी आली आहे. महाराष्ट्र महिला शक्ती महासंघाने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीन दिवसांपूर्वी निवेदन दिले आहे. अर्थसंकल्पात ज्या योजनेसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे त्यावरच ती खर्च करणे अपेक्षित असते. मात्र, तसे न करता एका योजनेचा निधी दुसरीकडे वळविण्याची (पुनर्विनियोजन) धडपड आता अनेक खात्यांचे ज्येष्ठ अधिकारी करीत आहेत. ज्या योजनेसाठी वा कामांसाठी निधी दिलेला होता तिथे तो का वापरला नाही आणि अन्य योजनेकडे तो का वळविणे आवश्यक आहे याची ठोस कारणे वित्त विभागाला द्यावी लागतात. त्यांची नीट तपासणी करूनच निधी वळविण्याची परवानगी दिली जाते. बरेचदा ती नाकारलीदेखील जाते. मात्र, अशी परवानगी मिळावी म्हणून विविध खात्यांचे मंत्री आणि ज्येष्ठ अधिकारी हे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे समजते. वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा मान्य केला तरी ३१ मार्चला दोन दिवस उरलेले असताना अद्याप ४० टक्के निधी अखर्चित असल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. आपल्या सरकारमध्ये ३१ मार्चच्या रात्री मंत्रालय सुरू राहणार नाही, अशी ग्वाही वित्त मंत्री झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. तथापि, या वेळी अखर्चित निधीचे प्रचंड प्रमाण लक्षात घेता ३१ मार्चची रात्र वित्त आणि अन्य विभागाचे अधिकारी जागून काढतील, असे दिसते. केवळ ५२ टक्केच खर्च!२०१६-१७च्या अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी केलेली आर्थिक तरतूद परवा ३१ मार्चपर्यंत खर्च करणे अनिवार्य आहे. असे असताना आतापर्यंत सरासरी ५२ टक्केच खर्च झाल्याची आकडेवारी शासनाच्याच वेबसाईटवर आज देण्यात आली आहे.वित्त विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी दावा केला की, वेबसाईटवरील बिम्स् प्रणालीत देण्यात आलेली माहिती अपुरी आहे. जवळपास ६० टक्क्यांहून अधिक तरतूद खर्च झाली आहे.