शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
3
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
4
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
5
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
6
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
7
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
9
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
10
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
11
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
12
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
13
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
14
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
15
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
16
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
17
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
18
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
19
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
20
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप

धावपटू कविता राऊत होणार अधिकारी

By admin | Updated: March 27, 2017 21:55 IST

कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात येत्या काही दिवसांतच वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळणार आहे.

नाशिक : देशाची व नाशिकची मानबिंदू कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात येत्या काही दिवसांतच वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळणार आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी त्याचे जाहीर सुतोवाच सोमवारी (दि.२७) नाशिकला केला.ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी नाशिकची कन्या व मानबिंदू कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात नोकरी देण्याची मागणी सोमवारी नाशिकला झालेल्या आदिवासी विकास सेवक पुरस्कार वितरण सोहळ्यात केली. त्याला उत्तर देताना आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी ही घोषणा केली. कविता राऊत हिने नाशिक आणि महाराष्ट्राचीच शान नव्हे तर भारताचा मान वाढविला आहे. सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणाऱ्या कविता राऊत हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके घेतानाच आॅल्मिपिकमध्येही सहभागी होऊन नाशिकची व महाराष्ट्राची शान वाढविली आहे. त्यामुळे कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात वर्ग एक अधिकारी करण्याबाबतचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने तयार केला असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही झाली आहे. कविता राऊत यांना आदिवासी विकास विभागाच्या सेवेत घेतल्यास त्यापासून अनेक आदिवासी युवक-युवतींना प्रेरणा मिळणार आहे. कविता राऊत यांच्या नोकरीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, प्रधान सचिव व मुख्यमंत्र्यांच्या मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच कविताला आदिवासी विकास विभागाच्या सेवेत रुजू करून घेण्यात येणार असल्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी जाहीर केले.