शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खटला कोल्हापूरबाहेर चालवा

By admin | Updated: December 19, 2015 02:10 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि सनातन संस्थेचा सदस्य समीर गायकवाड याने कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयातून खटला जिल्ह्याबाहेर वर्ग करण्यासाठी उच्च

मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि सनातन संस्थेचा सदस्य समीर गायकवाड याने कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयातून खटला जिल्ह्याबाहेर वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत यावर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.विशेष तपास पथकाने सप्टेंबर २०१५मध्ये समीरला सांगली येथून अटक केली. त्यानंतर समीरने १५ डिसेंबर रोजी हा खटला कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयातून राज्यात अन्य ठिकाणी वर्ग करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. ए.आर. जोशी यांच्या खंडपीठापुढे झाली. याचिकेनुसार, कोल्हापूर दंडाधिकाऱ्यांनी समीरचा रिमांड देताना पानसरेंच्या नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले. कायद्यानुसार, आरोपीला रिमांड देताना पीडितांच्या नातेवाइकांची बाजू ऐकण्याची तरतूद नाही. कनिष्ठ न्यायालय जनमतप्रवाहात वाहून गेल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे. त्याशिवाय कोल्हापूरमध्ये पानसरेंच्या समर्थकांनी भव्य रॅली काढून कोल्हापुरातील वातावरण दूषित केले आहे. हा खटला घेण्यास एकही वकील तयार नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा नाही, असे गायकवाडने याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)पानसरे कुटुंबीयांचा विरोधया खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांचा अथवा अन्य कुणाचाच कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. गायकवाडनेही आजपर्यंत त्याबद्दल कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे हा खटला कोल्हापूरच्या बाहेर चालविण्याची मागणी करणे चुकीचे आहे. त्यास आमचा विरोध राहील, असे गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी म्हटले आहे.