शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘रन-वे विकलेत का?’ हायकोर्ट संतप्त

By admin | Updated: January 14, 2017 05:57 IST

जुहू विमानतळाच्या भूखंडावरील झोपडपट्टयांचे सर्वेक्षण करण्याची मुभा विमानतळ प्राधिकरणाने दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने

मुंबई : जुहू विमानतळाच्या भूखंडावरील झोपडपट्टयांचे सर्वेक्षण करण्याची मुभा विमानतळ प्राधिकरणाने दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. ‘रन वेही विकलेत का?’ असा संतप्त सवालच उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला केला. कोणत्याही परिस्थितीत विमानतळाच्या भूखंडावर झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याची कोणतीही योजना राबू देणार नाही, अशी तंबीही न्यायालयाने प्राधिकरणाला दिली.जुहू विमानतळाच्या भूखंडावर झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याची योजना राबवण्यासाठी दिलेल्या आदेशांसंदर्भात तपास करण्यात यावा, तसेच २२, ४०० चौ. मी. भूखंडावर योजना सुरू न करण्याचा आदेश संबंधित प्राधिकरणांना द्यावा, यासाठी सांताक्रुझचे रहिवासी बाबू जगताप यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. जुहू विमानतळाच्या भूखंडावरील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याची परवानगी खुद्द भारतीय विमानतळ प्राधिकरणानचे दिल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. ‘रन वेही विकलेत का?’ असा संतप्त सवाल करतानाच, ‘भविष्यात विमानतळ वाढवायचे असेल तेव्हा तुम्ही आणखी ५० किलोमीटर दूर जाणार,’ असा उपरोधिक टोलाही न्यायालयाने लगावला. मात्र विमानतळाच्या भूखंडावर एसआरएची योजना सुरू करण्याचा अद्याप एकही प्रस्ताव आला नसल्याचे  विमानतळ प्राधिकरण आणि एसआरएने खंडपीठाला सांगितले. 

काही खासगी विकासक एसआरएची योजना राबवण्यासाठी झोपडपट्टीधारकांकडून सहमती घेत असल्याची बाब याचिकाकर्त्यांचे वकील अशोक सरोगी यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणली. ‘याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी निदर्शनास आणलेली बाब आणि सध्या जुहू विमानतळही कार्यरत नसल्याने कोणीतरी या भूखंडावर एसआरए योजना राबविण्यात इच्छुक आहे, हे स्पष्ट आहे. विमानतळाच्या भूखंडावर आम्ही कोणत्याही योजनेला परवानगी देणार नाही. प्राधिकरणाने येथील झोपडपट्टीवासियांचे अन्य कुठेतरी पुनर्वसन करावे. अशा प्रकारची योजना या जागेवर राबवून दिली तर भविष्यात विमानतळाचा विकास करणे कठीण जाईल,’ असे खंडपीठाने म्हणत खंडपीठाने संबंधित भूखंडावर योजनेसाठी सुरू असलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली.