शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी आमदारच नाराज

By admin | Updated: March 2, 2015 01:57 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने सत्तेवर येताच तीन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या सर्व कामांचे ई-टेंडरिंग केल्याने आणि महामंडळावरील नियुक्त्या हो

संदीप प्रधान, मुंबईराज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने सत्तेवर येताच तीन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या सर्व कामांचे ई-टेंडरिंग केल्याने आणि महामंडळावरील नियुक्त्या होत नसल्याने दोन्ही पक्षांचे सत्ताधारी आमदार नाराज असून, विधानसभेच्या अधिवेशनात या नाराजीचा सामना सरकारला करावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.मागील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने १० लाखांपेक्षा जास्त रकमेच्या कंत्राटांचे ई-टेंडरिंग केले होते. प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्याकरिता भाजपा-शिवसेना सरकारने तीन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या कंत्राटांचे ई-टेंडरिंग करण्याचा निर्णय घेतला. भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता हा निर्णय चांगला असला, तरी यामुळे आमदारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना छोटी कामे देऊन त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यात अडसर निर्माण झाला आहे. मागील सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी १० लाखांपेक्षा कमी रकमेची अनेक कामे आपल्या कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असा आग्रह भाजपा व शिवसेनेच्या आमदारांनी धरला आहे. दिल्लीतील पराभव भाजपा कार्यकर्त्याच्या नाराजीमुळे झाला. त्यामुळे त्यातून आपण काही शिकलो नाही तर महापालिका निवडणुकीत फटका बसेल, असे मत सत्ताधारी आमदार व्यक्त करीत आहेत.महामंडळांच्या नियुक्त्या झालेल्या नसल्यानेही नाराजी आहे. भाजपाने महामंडळांच्या नियुक्त्या त्यांच्या पक्षाच्या सदस्य नोंदणीशी जोडल्या आहेत. ३१ मार्च २०१५ पर्यंत एक कोटी सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य भाजपाने ठरवले आहे. आतापर्यंत ६० लाख सदस्य नोंदले आहेत. महामंडळाच्या नियुक्त्यांवरून नाराजी निर्माण होऊ नये, याकरिता कदाचित पुन्हा महामंडळाच्या नियुक्त्या टाळल्या जातील, अशी भीती आमदारांना वाटते. सरकार येऊन पाच महिने उलटले. अशाच पद्धतीने नियुक्त्या टाळल्या तर मागील सरकारमध्ये असंतुष्टांना चुचकारण्याकरिता महामंडळाचे गाजर पुढे धरले जायचे तसेच याही सरकारमध्ये होईल, अशी शंका आमदार व्यक्त करीत आहेत.