शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश हॉर्नवर आरटीओ कारवाई करणार

By admin | Updated: October 6, 2015 02:44 IST

अनधिकृत कर्णकर्कश सायरन आणि हॉर्नमुळे झोपेत येणारा अडथळा तसेच होणारा मनस्ताप पाहता राज्यात याविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय आरटीओकडून घेण्यात

मुंबई : अनधिकृत कर्णकर्कश सायरन आणि हॉर्नमुळे झोपेत येणारा अडथळा तसेच होणारा मनस्ताप पाहता राज्यात याविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय आरटीओकडून घेण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतर या कारवाईला सुरुवात करत असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. यासाठी आवाजासहीत व्हिडीओ क्लिपसह तक्रार जनतेने दाखल करावी, असे आवाहन परिवहन आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे. यासाठी परिवहन कार्यालयांचे पत्ते व ई-मेल आयडी www.mahatranscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. वरळी येथे राहणारे दिलीप निवेटिया यांनी पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादाकडे अनधिकृत कर्णकर्कश सायरन आणि हॉर्नविरोधात नुकतीच एक याचिका दाखल केली होती. अनधिकृत सायरन आणि हॉनमुळे मनस्ताप होत असून त्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच त्याची नियमावली ठरवण्यात यावी,असे याचिकेत नमूद होते. या याचिकेवर लवादाकडून वाहनांवरील अनधिकृत सायरन तसेच हॉर्नच्या वापराबाबत राज्य परिवहन आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीसांना निर्देश दिले आहेत. माहिती मिळाल्यानंतर अनधिकृत हॉर्न आणि सायरन विरोधात कारवाई केली जाईल. यात वाहन दोषी आढळल्यास दोन हजार रुपये दंड आणि हॉर्न किंवा सायरन जप्त केला जाईल, असे सांगण्यात आले. हे निर्देश पोलीस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही असल्याने त्यांच्याकडूनही कारवाई केली जाईल.