शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रेयच्या १२५ ठेवीदारांना १७ लाख रुपये परतावा

By admin | Updated: July 29, 2016 22:15 IST

राज्यातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेल्या मैत्रेय कंपनीच्या १२५ ठेवीदारांना शुक्र वारी १७ लाख १४ हजार ३९७ रुपये डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून परत करण्यात आले

ऑनलाइन  लोकमतनाशिक, दि २९ : राज्यातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेल्या मैत्रेय कंपनीच्या १२५ ठेवीदारांना शुक्र वारी १७ लाख १४ हजार ३९७ रुपये डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून परत करण्यात आले. या प्रकरणात गुंतवणूकदारांनी गुंतविलेली रक्कम त्यांना व्याजासह परत मिळणार असून, देशातील विविध आर्थिक गुन्हे प्रकरणात अशाप्रकारे एवढ्या कमी कालावधित पहिल्यांदाच ठेवीदारांना व्याजासह परतावा मिळणार असल्याचे पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांकडे आतापर्यंत १४ हजारांहून अधिक तक्र ारी प्राप्त झाल्या आहेत. यातील नाशिकच्या १२५ ठेवीदारांना १७ लाख १४ हजार ३९७ रुपयांचा परतावा देण्यात आला. न्यायालयाने मान्यता दिल्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील प्रथम टप्प्याचे वाटप शुक्रवारी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार राजश्री अहिरराव, सरकारी वकील अजय मिसर, लेखा परीक्षक अमित शर्मा, उपायुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे आदि उपस्थित होते. मैत्रेय कंपनीचे इस्क्र ो खात्यात सहा कोटी ३५ लाख रु पये आहेत.

कंपनीच्या देशभरात तब्बल एक ते दीड हजार कोटींची मालमत्ता असून, त्यांच्या जप्तीची प्रक्रि याही सुरू आहे. ठेवीदारांच्या रकमेचा परतावा देण्यासाठी समितीने ज्या ठेवीदारांचा परतावा कमी रकमेचा आहे, त्यांना सुरुवातीला रक्कम देण्यास सांगितले आहे. शहरातील ठेवीदारांच्या परताव्यानंतर इतर जिल्ह्यातील ठेवीदारांना इस्क्रो खात्यातून परतावा देण्याचे न्यायालयाने सूचित केले आहे. विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार समितीने मुदत संपलेल्या व कमी देय रकमेचा परतावा असलेल्या ठेवीदारांची यादी तयार केली.

यातील १२५ ठेवीदारांची यादी समितीने मंजूर करीत संबंधितांना या रकमेचे डिमांड ड्राफ्टचे वाटप करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात यश प्राप्त करणाऱ्या तपास समितीला व पोलीस आयुक्तांना मिळालेल्या बढतीसाठी अभिनंदन करणारे मुख्यमंत्री कार्यालयाचे व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाचे पत्र यावेळी वाचून दाखविण्यात आले. परतावा मिळाल्याने आनंद कष्टाचे पैसे बुडणार की काय असा प्रश्न मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना सतावत होता. यातील नीलिमा अग्निहोत्री (८११०), कल्पना चव्हाण (९४६८), शफीक सय्यद (२२२५०) आशिष वाणी, भरत जाधव (११५५) कचरू शेंडे, मुरलीधर गांगुर्डे, असिफ शेख, अर्चना खैरनार, सुनीता भगत, विठाबाई बकूळ, सविता यादव आदिंसह १२५ ठेवीदारांना शुक्रवारी प्रथम टप्प्यात १७ लाख १४ हजार ३९७ रुपयांचा परतावा देण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. उर्वरित ठेवीदारांनाही पैसे मिळणार असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.