शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या २२८ सोसायट्यांना पाण्याअभावी १२ कोटी रुपयांचा भुर्दंड

By admin | Updated: April 8, 2017 05:13 IST

पुणे महापालिकेकडून २२८ सोसायट्यांनी पाण्याच्या टँकरसाठी खर्च केलेले १२ कोटी रुपये वसूल करण्याचे संकेत उच्च न्यायालयाने दिले आहेत

मुंबई : नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून न देता, निव्वळ महसुलासाठी नव्या बांधकामांना परवानगी देणाऱ्या पुणे महापालिकेकडून २२८ सोसायट्यांनी पाण्याच्या टँकरसाठी खर्च केलेले १२ कोटी रुपये वसूल करण्याचे संकेत उच्च न्यायालयाने दिले आहेत. बाणेर व बालेवाडी परिसरातील या सोसायट्या आहेत. या सोसायट्यांव्यतिरिक्त आणखी ४०० सोसायट्यांनी पाण्याच्या टँकरसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याची शक्यता याचिकाकर्त्यांनी वर्तवली आहे.पुण्यातील अमोल बालवडकर यांनी बालेवाडी व बाणेर इत्यादी ठिकाणी पाण्याची प्रचंड कमतरता असून, येथील रहिवाशांना पाण्याच्या टँकरसाठी दरवर्षी सुमारे ३० ते ३५ लाख खर्च करावे लागतात. गेली १५ वर्षे येथील रहिवाशी अशाच स्थितीत राहात आहेत. मात्र, महापालिकेने त्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे कर्तव्य महापालिका पार पाडण्यास अपयशी ठरली आहे. त्यामुळे महापालिकेला या ठिकाणी पाणीपुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने बाणेर व बालेवाडी परिसरातील किती सोसायट्यांनी पाण्यासाठी टँकर मागवले व त्यासाठी किती रुपये खर्च केले, याची माहिती याचिकाकर्त्यांना देण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार, शुक्रवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील अनुराग जैन यांनी बालेवाडी व बाणेरच्या २२८ सोसायट्यांनी एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या आर्थिक वर्षात पाण्याच्या टँकरसाठी १२ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.याच परिसरात आणखी ४०० सोसायट्यांनीही पाण्याच्या टँकरसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याची शक्यता आहे. या सोसायट्यांची माहिती मिळवण्यासाठी काही आठवड्यांची मुदत देण्याची विनंती जैन यांनी उच्च न्यायालयाला केली.त्यावर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सर्व सोसायट्यांची माहिती काढण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देत, पाण्यासाठी सोसायट्यांनी खर्च केलेली रक्कम पुणे महापालिकेकडूनच वसूल करण्याचे संकेत दिले. सोसायट्यांनी सादर केलेली रक्कम खरी आहे की खोटी, याची छाननी करण्यासाठी प्रसंगी समिती नेमण्याचाही संकेत उच्च न्यायालयाने दिला आहे. (प्रतिनिधी)>तीन आठवडे मुदतउच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सर्व सोसायट्यांची माहिती काढण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देत, पाण्यासाठी सोसायट्यांनी खर्च केलेली रक्कम पुणे महापालिकेकडूनच वसूल करण्याचे संकेत दिले.