शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

आर.आर. पाटील १०० मीटर तरी पळतील का - राज ठाकरे

By admin | Updated: June 15, 2014 18:15 IST

पोलिस भरतीमध्ये धावण्यासाठी तरुणांना ५ किलोमीटरचे अंतर दिले जात असले तरी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील १०० मीटर तरी पळतील का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १५-  पोलिस भरतीसाठी ग्रामीण भागातील तरुण मुंबईत येतात. एसटीने मुंबई गाठणारी ही मुलं उपाशी पोटी असतात. अशा स्थितीत या तरुणांना धावण्यासाठी ५ किलोमीटरचे अंतर ठेवले जाते. राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील १०० मीटर तरी पळू शकतील असा खोचक सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. पोलिस भरती मुंबईत घेण्याऐवजी जिल्हा जिल्ह्यात का घेतली जात नाही असा सवालही त्यांनी गृहमंत्रालयाला विचारला आहे. 
आमदार प्रवीण दरेकर यांच्या विधानसभेतील भाषणांचे 'राजगर्जना' हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. रविवारी बोरिवलीत मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. या प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरेंनी पोलिस भरतीवरुन गृहमंत्रालयावर जोरदार टीका केली. पोलिस भरतीसाठी आलेले तरुण धावल्याने मृत्यूमुखी पडतात ही दुर्दैवी घटना आहे. पोलिस भरतीतील जाचक नियम बदलण्याची गरज असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. आर. आर. पाटलांना खाकीतील पोस्टमन आणि पोलिस यातील फरकच कळत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ
विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केली होती. राज ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील याबाबत कमालीची उत्सुकता आहे. याविषयी ठाकरे म्हणाले, २८८ पैकी एकही मतदार संघ माझा नसून महाराष्ट्र राज्य हाच माझा मतदारसंघ आहे. मला फक्त आमदार होण्यात रस नसून मला महाराष्ट्राचा विकास घडवायचा आहे.  जुलै- ऑगस्टमध्ये मी राज्याची विकास योजना जनतेसमोर मांडणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 
नेत्यांनी काळानुसार बदलावे
विधानसभा ही जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची जागा आहे. मोजक्या शब्दात प्रश्न मांडून त्यावर मोजक्या शब्दात उत्तर देऊन जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने विधानसभेत काही नेते लांबच लांब भाषण करतात. त्यामुळे वेळ खर्ची होतो अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. नेत्यांनी काळानुसार बदलणे गरजेचे असून त्यासाठी भाषा सुधरवावी असा सल्लाही त्यांनी पक्षातील आमदारांना दिला.