शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइं ऐक्यासाठी राजीनामा द्यायला तयार

By admin | Updated: May 28, 2017 00:38 IST

रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा

- लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी रिपाइंचे ऐक्य करण्यापूर्वी आठवले यांनी राजीनामा द्यावा, असे सांगितले होते. त्याकडे लक्ष वेधल्यावर आठवले म्हणाले की, गेल्या ७० वर्षात जे झाले नाही, ते गेल्या तीन वर्षात करण्याचा प्रयत्न झाला. काही लोक संविधान बदलण्यात येणार असल्याचा आरोप करतात परंतु भारताचे संविधान बदलले जाणार नाही. तसेच आरक्षणही कायम राहील.सहारनपूर येथील घटना ही चुकीचीच आहे. परंतु केवळ भाजपा सत्तेवर आली म्हणून दलितांवर अत्याचार सुरू झाले असे म्हणता येणार नाही. उत्तर प्रदेशात दलितांवर अत्याचार हे यापूर्वीही होत होते. दलित अत्याचारात उत्तर प्रदेश हा नेहमीच पुढे राहिला आहे. असे असले तरी ही घटना घडायला नको होती, असेही आठवले यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी आमच्या पक्षाचीही मागणी आहे. परंतु कर्जमाफीपेक्षा कर्जातून मुक्ती आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, अशी यंत्रणा निर्माण करावी. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठून निधी उभा करता येईल, यासाठी विरोधी पक्षानेही सुद्धा बसून चर्चा करावी, केवळ विरोध करू नये, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम लोकांना आवडत आहेत. त्यांच्या नेतृत्वात देश नक्कीच प्रगती करेल असा विश्वास लोकांमध्ये असल्याने२०१९ च्या निवडणुकासुद्धा आम्हीच जिंकू.- रामदास आठवले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री