शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अंथुर्णेत निकृष्ट धान्याचा पुरवठा

By admin | Updated: July 31, 2016 01:16 IST

येथे दर महिन्याला निकृष्ट धान्यपुरवठा होत आहे.

अंथुर्णे : येथे दर महिन्याला निकृष्ट धान्यपुरवठा होत आहे. अतिशय निकृष्ट सडलेला गहू, बारीक व भिजलेली साखर, त्याच पद्धतीचा तांदूळ व धान्यात खडे, माती व मोठ्या प्रमाणावर असलेल्या उंदरांच्या लेंड्या अशा पद्धतीचे धान्य अंथुर्णे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडावूनमध्ये असलेल्या स्वस्त धान्य दुकानात येत असते. त्याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सर्वसामान्य गोरगरीब याच धान्याची पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतात. परंतु हेच धान्य गेल्या दोन महिन्यांपासून अनेकांना मिळालेले नसल्याने व चांगल्या प्रतीचे धान्य घेण्याची ऐपत नसल्याने अनेकांना उपासमार करावी लागत आहे. या स्वस्त धान्य दुकान चालकाकडे धान्य केव्हा मिळणार, या बाबत विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे मिळतात. येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडावूनमध्ये सोसायटीचे स्वस्त धान्य दुकान आहे. या ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या तारखेला धान्य येते. आलेले धान्य वाटपाकरिता शासन नियमाप्रमाणे व दिलेल्या वेळेत हे दुकान सुरू नसते. दुकानचालकाच्या सवडीने हे दुकान सुरू असल्याने अनेकांना अंथुर्णे व परिसरातून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून यावे लागते.त्यात महिलावर्गाला गैरसोयीला सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा कमी प्रमाणात व निकृष्ट धान्य या ठिकाणी दिले जात असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. काही वेळा कमी कोटा आल्याचे सांगून धान्य दिले जात नाही. परिणामी दर महिन्याला या ठिकाणी शाब्दिक तक्रारी मोठ्या प्रमाणवर होत असतात. संबंधित पुरवठा अधिकाऱ्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने तालुक्यातील अन्य अनेक स्वस्त धान्य दुकानांची अशीच अवस्था आहे. या दुकानदारांना अधिकृत सरकारी परवाना असला, तरी ते त्यानुसार वागत नाहीत, आमचे कोणीच काही करू शकत नाही या आविर्भावात असतात. तसेच या ठिकाणी असणाऱ्या विविध अंत्योदय बीपीएल शिधापत्रिकांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणे गरजेचे आहे. दरमहा येणारा धान्याचा कोटा तपासला जाणे आवश्यक आहे. या ठिकाणची गावपातळीवरील स्थानिक दक्षता कमिटी फक्त भिंतीवर लावलेल्या नावापुरतीच मर्यादित असून, या कमिटीचे नक्की काय काम आहे हेच नागरिकांना अघापपर्यंत माहिती नाही. (वार्ताहर)तक्रारीची दखल नाही : स्वच्छतेचा अभावपरिसरातील इतर स्वस्त धान्य दुकानांत वेळेवर व चांगल्या प्रतीचे धान्य दर महिन्याला येते. परंतु वर्षानुवर्षे या ठिकाणची परस्थिती जैसे थे असून, या बाबत लोकांच्या तक्रारींची दखल घेण्याकरिता या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. साधी तक्रार पुिस्तका तर सोडाच दरफलकही येथे नाही. वेळेचा फलक बाहेर पेंटने तयार केला आहे. त्याप्रमाणे दुकान कधीच उघडे नसते. मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेचा अभाव असल्याने घुशी व उंदरांचा सुळसुळाट या धान्य दुकानात आहे.