शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

प्रस्तावित विरार-अलिबाग कॉरिडोरची रखडपट्टी

By admin | Updated: March 6, 2017 02:59 IST

विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोरमुळे अलिबागसह रायगड जिल्हा विकासाच्या टप्प्यात येणार आहे.

नवी मुंबई : रस्तेवाहतुकीला नवा आयाम देणाऱ्या प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोरमुळे अलिबागसह रायगड जिल्हा विकासाच्या टप्प्यात येणार आहे. त्यामुळे १२६ कि.मी. लांबीच्या या मार्गालगत व परिसरात मागील काही वर्षांत हजारो कोटींची गुंतवणूक झाली आहे. मात्र, विविध कारणांमुळे या कॉरिडोरच्या कामाला खीळ बसल्याने नियोजित विकास रखडला आहे. तसेच त्यामुळे हजारो कोटींची गुंतवणूक धूळखात पडून आहे. या पार्श्वभूमीवर या बहुद्देशीय कॉरिडोरचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २0१२मध्ये विरार-अलिबाग कॉरिडोरची घोषणा केली होती. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून या मार्गिकेचा विकास करण्याची योजना आहे. २0१४ पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते; परंतु पाच वर्षे उलटली तरी त्यादृष्टीने कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. परिणामी, या क्षेत्रातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.१२६ कि.मी. लांबीच्या हा कॉरिडोर प्रस्तावित मुंबई ट्रान्स हार्बर एक्स्प्रेस वे (एमटीएचएल) व नागपूर समृद्धी एक्स्प्रेस मार्गासह जवळच्या जेएनपीटीला जोडला जाणार आहे. नवी मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली, मीरा-भार्इंदर, कर्जत, खोपोली, पनवेल, उरण, पेण, वसई, विरार, नालासोपारा,नवघर या शहरांसह अलिबाग, माथेरान आदी ९९६ गावांचा विचार करून एमएमआरडीएने वाहतुकीचा अहवाल तयार केला आहे. विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कोरिडोर हा याच प्रयोजनाचा भाग आहे. त्यामुळे अलिबाग आणि विरार या दरम्यानचा प्रवास काही तासांनी कमी होणार आहे. विकासाला गती मिळणार आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. या कॉरिडोरमुळे विरार, भिंवडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण आणि अलिबाग ही विकास केंद्रे तयार होणार आहेत. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी, रेवस पोर्ट, सिडकोचा नैना प्रकल्प आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी हा मार्ग नवसंजीवनी देणारा ठरणारा आहे. विरार-अलिबाग कॉरिडोरमुळे दळणवळणाचे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. राज्य सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत इन्फ्राटेक या कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक के. डी. राठोड यांनी व्यक्त केले आहे.विरार-अलिबाग कॉरिडोरमुळे दळणवळणाचे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या परिसरात परवडणाऱ्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत इन्फ्राटेक या कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक के. डी. राठोड यांनी व्यक्त केले आहे.विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कोरिडोर हा याच प्रयोजनाचा भाग आहे. त्यामुळे अलिबाग आणि विरार या दरम्यानचा प्रवास काही तासांनी कमी होणार आहे. विकासाला गती मिळणार आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. या कॉरिडोरमुळे विरार, भिंवडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण आणि अलिबाग ही विकास केंद्रे तयार होणार आहेत.