शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत प्रथमच रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट

By admin | Updated: July 5, 2017 11:59 IST

मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल हे रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट करणारे राज्यातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, असा दावा या हॉस्पिटलकडून करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल हे रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट करणारे राज्यातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, असा दावा या हॉस्पिटलकडून करण्यात आला आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या माहितीनुसार, ही शस्त्रक्रिया करताना आव्हानं होती. मात्र सहका-यांच्या सहाय्यानं ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. 
 
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट सामान्य ट्रान्सप्लांटच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. शिवाय ही शस्त्रक्रिया कमी वेळात पूर्ण होते. सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलनं अंधेरीतील सी.एन.मुरलीधरन यांच्यावर ही रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली आहे. 
 
निकामी झाली होती किडनी
हॉस्पिटलनं दिलेल्या माहितीनुसार, सी.एन. मुरलीधरन (वय 59 वर्ष) यांची किडनी निकामी झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीनं प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणं गरजेचं होतं. मात्र किडनी मिळण्यास अडथळे येत असल्यानं मुरलीधरन यांना प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. पण यावेळी मुरलीधरन यांच्या अर्धांगिनी लीना (वय 55 वर्ष) यांनी आपली एक किडनी त्यांना देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत लीना यांनी सांगितले की, माझे पती गेल्या दीड वर्षांपासून डायलेसिसवर होते. त्यांची या त्रासातून सुटका व्हावी व सर्वसामान्यांप्रमाणे त्यांना आयुष्य जगता यावे, यासाठी मी त्यांना आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला.
आणखी बातम्या वाचा 
(६२ बालकांची हृदय शस्त्रक्रिया)
(विना शस्त्रक्रिया फुफ्फुसातून काढला खिळा)
(चमत्कार! 12 तासाची शस्त्रक्रिया, सहा हार्ट अटॅकनंतरही बचावली चिमुकली)
 
प्रत्यारोपणानंतर डायलेसिसच्या त्रासातून कायमची मुक्तता झाल्यानं मुरलीधरनदेखील फारच खूश झाले आहेत.  सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलनं मुरलीधरन यांच्यावर रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेले किडनी प्रत्यारोपण ही राज्यातील पहिली शस्त्रक्रिया आहे. विशेष म्हणजे रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेत रक्तस्त्राव कमी होतो व संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. 
 
नेफ्रोलॉजिस्ट डॉ. श्रुती तापियावाला यांच्या मते, या रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेमुळे केवळ रुग्णच नव्हे तर दात्यालाही कमी वेदना होतात. वेदनेचे प्रमाण इतके कमी असते की त्यांना पॅरासिटामोलसारखी पेन किलर देण्याचीही गरज भासत नाही. दरम्यान, मुरलीधरन आणि त्यांची पत्नी दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.