शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तडवळ स्टेशनवर रेल्वेवर दरोडा

By admin | Updated: May 29, 2016 21:06 IST

तडवळ रेल्वेस्टेशन वर थांबलेल्या हुबळी- सिंकदराबाद एक्सप्रेसवर रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दरोडा पडला

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 29-  तडवळ रेल्वेस्टेशन वर थांबलेल्या हुबळी- सिंकदराबाद एक्सप्रेसवर रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दरोडा पडला.या दरोड्यात चोरट्यांनी प्रवाशांना मारहाण करुन ९ तोळे दागिने लुटले.घटने दरम्यान आरपी एफ पोलीसांची अनुउपस्थिती दिसल्याने प्रवाशांनी चारतास रेल्वे अडवून धरुन राग व्यक्त केला.याबाबत सुनिल सतिश तिवारी (वय ४५,रा. सिंगापूर, हैद्रराबाद) यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दुपारी फिर्याद नोंदवली. तिवारे हे २८ मे रोजी सिंकदराबादला जाण्यासाठी हुबळी स्थानकावरुन निघाले. दरम्यान रेल्वे रविवारी पहाटे चार वाजता तडवळ रेल्वेस्टेशनवर पंधरा मिनिट थांबली. दरम्यान बोगी क्रमांक एस १,४,५,६ या डब्यातून महिला आणि पुरुषांचा आरडा ओरडीचा आवाज आला. त्यांनी बाहेर डोकावले असता काही चोरटे दागिने लुटून निघाल्याचे दिसले. अंगात काळया निळया रंगाचे शर्ट हाफ पॅन्ट परिधान केले दरोडेखोर तिथून पळत जाताना दिसले. तिवारी यांनी इतर डब्यामध्ये फिरुन पाहणी केली असता, तिखिट तपासणीस व आरपीएफ जवान दिसून आले नाहीत. आरपीएफ जवानांनी दाखविलेल्या हलगरजी पणाचा राग होडगी स्टेशनवर रेल्वे थांबवून प्रवाशांनी व्यक्त केला. तणावाच्या वातावरणात अधिकाऱ्यांनी गाडी पुढे नेली. याचा तपास लोहमार्गचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद सातव हे करत आहेत. ...................अधीक्षक तडवळयात ठाण मांडूनप्रवाशांनी होडगी रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोकून धरल्याची समजातातच, अधिक्षक विश्व पानसरे हे सोलापूरात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी जावून विभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणची माहिती घेण्यास सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नव्हते. ..................ग्रामीणकडून श्वान पथक देण्यास नकार सदर घटनेनंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी ग्रामीण पोलिसांकडे एका पत्राव्दारे श्वान पथकाची मागणी केली. मात्र सामाजिक न्याय मध्ये बडवले हे सोलापूरात आले असून त्यांच्या बंदोस्तासाठी हे श्वान पथक देण्यात आल्याचे सांगून टाळाटाळ केली. त्यामुळे लोहमार्ग पोलीसांनी आरपीएफ पोलिसांच्या श्वान पथकावर अवलंबून राहवे लागले. त्यांचा काही फायदा झाला नाही.