शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर लूटमार करणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: September 18, 2016 00:45 IST

पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळेस गाड्या अडवून लूटमार करणारी टोळी पकडण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले आहे.

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळेस गाड्या अडवून लूटमार करणारी टोळी पकडण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेल्या चार दुचाकींसह चोरीचा ऐवजही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे स्वागत करण्यात आले.अक्षय सूर्यवंशी (रा. रणगाव, वालचंदनगर, ता. इंदापूर), गौरव पांडुरंग चव्हाण (रा. किल्ला, करमाळा), महेश गायकवाड (रा. रणगाव), अमर पंढरीनाथ कौन्डुभैरी (रा. रणगाव) अशी पकडण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या चार दुचाकी, लुटलेली रक्कम, तसेच इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सी. एम. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस पुणे-सोलापूर महामार्गावरील भादलवाडी ते पळसदेव या टप्प्यात ट्रकचालकाला अडवून मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून लुटल्याच्या काही प्रकारची माहिती पोलीस ठाण्याला मिळाली होती. हा प्रकार वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकबाबतीत जास्त होत असल्याचे आढळून आले. यादव यांनी भिगवण पोलीस ठाण्याचे चार-पाच पोलीस आणि या भागातील पोलीसमित्र यांची एक टीम तयार करून साध्या वेशात तपासणी चालू ठेवली होती. गणेश विसर्जनाच्या दिवशी १५ तारखेला रात्री १०.३० च्या सुमारास भादलवाडी येथील कागद कारखान्याच्यासमोर पाच चोरट्यांनी आपल्या मोटारसायकल आडव्या लावून यातील ट्रकचालक आणि क्लीनर यांना मारहाण करीत त्यांच्याकडील २६ हजार ५०० रुपये चाकूचा धाक दाखवीत लुटले. याच वेळी साध्या वेशात असणारे पोलीस आणि पोलीसमित्रांच्या लक्षात हा प्रकार आला. ते ट्रकशेजारी थांबेपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस नाईक गोरख पवार आणि इन्कलाब पठाण यांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)>एकेरी मार्गावर विरुद्ध दिशेने जवळपास आठ किलोमीटर आपल्या जिवाची पर्वा न करता पाठलाग करीत या चोरट्यांना जेरबंद केले. ही कारवाई भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी सी. एम. यादव, गोरख पवार, श्रीरंग शिंदे, रमेश भोसले करीत आहेत. गुन्ह्याच्या तपासकामी नेमलेल्या टीममध्ये पोलीसमित्र अविराज जगताप, समाधान पिसे, सागर शिंदे, सिद्धार्थ आळंदकर, अमित चांदगुडे यांनी कामगिरी केली.