शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

फूटपाथवर झोपलेल्यांना बेदम मारहाण करून लूट

By admin | Updated: May 8, 2014 12:22 IST

दोघे ताब्यात; विचारेमाळ परिसरातील फाळकूटदादांचा उच्छाद

कोल्हापूर : शहरात रस्त्यावर फूटपाथवर झोपलेल्या नागरिकांना अमानुषपणे मारहाण करीत त्यांच्या खिशातील पैसे व मोबाईल लूटमार करणार्‍या विचारेमाळ येथील दोघा संशयित फाळकूटदादांना काल (मंगळवार) मध्यरात्री लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलीस चौकशी करीत असून, त्यांचे आणखी पाच ते सहा साथीदार पसार झाले आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, शहरात रंकाळा स्टॅन्ड, गंगावेश, शिवाजी चौक, सीपीआर, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर परिसरातील फूटपाथवर झोपलेल्या नागरिकांना सात ते आठ फाळकूटदादांनी बेदम मारहाण करीत त्यांच्याजवळील पैसे व मोबाईल काढून घेत चालले होते. अचानक झालेल्या मारहाण आणि लूटमारीमुळे नागरिक बिथरून गेले. सीपीआरच्या आवारात झोपलेल्या एका नागरिकाला मारहाण करून त्यांनी त्याच्याजवळील आठशे रुपये काढून घेतले. यावेळी एका जागरूक नागरिकाने हा प्रकार लक्ष्मीपुरी पोलिसांना सांगितला. येथील गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख आठरे यांनी तातडीने पोलीस फौजफाटा घेऊन या फाळकूटदादांचा पाठलाग केला. शाहूपुरी पोलिसांचे बिट मार्शलही या फाळकूटदादांचा शोध घेऊ लागले. अखेर लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथे दोघे तरुण पोलिसांच्या हाती लागले. तर इतर पसार झाले. ताब्यात घेतलेल्या दोघा तरुणांकडे लक्ष्मीपुरी पोलिसांनी रात्रभर कसून चौकशी केली. त्याने अन्य साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या घरांची झडती घेतली असता ते मिळून आले नाहीत. सदर बझार, विचारेमाळ येथील हे फाळकूटदादा असल्याचे समजते. याप्रकरणी दोघा फाळकूटदादांकडे चौकशी सुरू असून उद्या (गुरुवार) सर्व चित्र स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)