शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

रोडरोमिओंचा उच्छाद

By admin | Updated: July 1, 2016 01:46 IST

वेगाने दामटणाऱ्या गाड्या, कर्कश हॉर्न; तसेच शाळा-महाविद्यालयीन मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंमुळे दौड शहरातील नागरिक त्रस्त झाले

दौंड : वेगाने दामटणाऱ्या गाड्या, कर्कश हॉर्न; तसेच शाळा-महाविद्यालयीन मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंमुळे दौड शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत स्थानिकांनी तक्रारी करूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. शहरातील सर्वच शाळांच्या परिसरात रोडरोमिओंचे टोळके असतात. विशेषत: सकाळी ६.३0 ते ७ च्या दरम्यान शाळा भरतेवेळी मुख्य रस्त्यांवर बऱ्यापैकी वर्दळ कमी असते. याचा फायदा घेत रोडरोमिओ शालेय विद्यार्थिंनीना लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करतात. पंचायत समिती आणि दौंड नगर परिषदेच्या नवीन इमारतीचा परिसर रोडरोमिओंचा अड्डा झाला आहे. एखादी शाळकरी मुलगी येत असेल, तर तिला पाहून अर्वाच्च भाषा वापरणे. अश्लील गाणे म्हणणे, शिट्या वाजविणे असे सर्रासपणे प्रकार सुरू आहेत. तर, काही रोडरोमिओंनी शाळकरी मुलींना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती पुढे आली आहे. याच परिसरात शाळकरी मुलींच्या सायकली ठेवलेल्या असतात. सायकलीच्या चाकांची हवा काढणे, सायकली नादुरुस्त करणे असेही कृत्य रोडरोमिओंकडून केले जात आहे. या रोडरोमिओंचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, रोडरोमिओंना पोलिसांच्या तावडीतून सोडण्यासाठी हस्तक्षेप होत असेल, तर पोलिसांनी अशा व्यक्तींची नावे जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)चेन स्रॅचिंगचे प्रकार वाढलेसायंकाळच्या सुमाराला रेल्वे कुरकुंभ मोरीकडे विवाहित महिलांचीदेखील छेड काढली जाते. तर, बऱ्याचदा दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. दुसरीकडे दुचाकीवरून जोरात येणे, महिला किंवा एखाद्या मुलीच्या पाठीमागे दुचाकी जागीच थांबविणे, त्यांच्या डोक्यात टपली मारून पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत.