शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरण उद्यापासून

By admin | Updated: April 6, 2017 03:35 IST

निवडणूक काळात थंडावलेली रस्ता रुंदीकरणाची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला

ठाणे : निवडणूक काळात थंडावलेली रस्ता रुंदीकरणाची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. त्यानुसार, मागील काही महिने चर्चेत असलेला समतानगर रोड नं. ३३ वर पहिला हातोडा पडणार असून यासोबत शहरातील अन्य तीन रस्त्यांवरही तो टाकला जाणार आहे. येत्या ७ एप्रिलला त्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.ठाणे महापालिकेने २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये ५२.४२१ किमी लांबीचे १०९ रस्तेबांधणीचा कार्यक्रम आखला असून हे सर्व रस्ते २०१७-१८ मध्ये पूर्ण करण्याचा पालिकेचा संकल्प आहे. त्यानुसार, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आयुक्त जयस्वाल यांनी पोखरण रोड नं. १, २, शास्त्रीनगर ते हत्तीपूल, सुभाष पथ (एसटी स्टॅण्ड ते कलेक्टर आॅफिस), खोपट रस्ता, मुंब्रा स्टेशन ते वाय जंक्शन, कापूरबावडी सर्व्हिस रस्ता, घोडबंदर सर्व्हिस रस्ता आदी भागांत रुंदीकरणाची कारवाई केली होती. त्यानंतर निवडणुकीमुळे कारवाईला ब्रेक लागला होता.दरम्यान, आता पुन्हा रस्ता रुंदीकरणाची मोहीम पालिकेने हाती घेतली असून येत्या ७ एप्रिलला पहिला हातोडा पडणार आहे. मागील काही महिने समतानगर येथे रोड नं. ३३ चर्चेचा विषय ठरला होता. या रस्त्यामध्येच शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाचा बंगला असल्याने या कारवाईला विरोध झाला होता. महासभेतदेखील हा विषय चांगलाच गाजला होता. आयुक्त जयस्वाल यांनी रस्तारूंदीकरणासाठी बेकायदा बांधकामांवर सातत्याने कारवाई केल्याने नागरिकांनी याचे स्वागत केले होते. (प्रतिनिधी) >अडथळे झाले दूरआता या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर झाले असून त्यावर पहिला हातोडा पडणार आहे. तसेच याच दिवशी नुरीबाबा दर्गा रोड, आर मॉलजवळील मनोरमानगरला थेट जोडणारा रस्ता आणि गुरुकुल पाचपाखाडी भागातील रस्त्यावर हातोडा टाकला जाणार आहे.