शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शकतेसाठी रस्त्यावर

By admin | Updated: March 6, 2017 04:01 IST

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सुचविलेल्या कामांवरच नगरसेवकांनी आपला निधी खर्च करावा, असा निर्णय घेतला

डोंबिवली : भाजपाने मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभाराचा मुद्दा लावून धरला असतानाच ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सुचविलेल्या कामांवरच नगरसेवकांनी आपला निधी खर्च करावा, असा निर्णय घेतला आहे. याच पारदर्शकतेचे अनुकरण कल्याण-डोंबिवली महापालिकेतही करावे, यासाठी भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी-लेनीनवादी) पक्षाने रविवारी डोंबिवलीतील दत्तनगर चौकात स्वाक्षरी मोहीम राबवली. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर राबविलेल्या या उपक्रमाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाणे महापालिकेतील नगरसेवकांना यापुढे आपला नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा आणि मागासवर्गीय निधी नागरिकांनी सुचविलेल्या कामांवरच खर्च करावा लागेल असा निर्णय आयुक्त जयस्वाल यांनी नुकताच घेतला. यामुळे नगरसेवक निधीच्या नावाने होणाऱ्या कोटयवधीच्या भ्रष्टाचाराला चाप बसणार आहे. असा निर्णय केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनीही घ्यावा अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल तर ठाणे महापालिका आयुक्तांप्रमाणे रवींद्रन यांनीही कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे पक्षाचे पदाधिकारी महेश साळुंखे आणि सुनील नायक यांनी सांगितले. महापालिकेच्या अर्थसंकल्पात नगरसेवक निधीसाठी कोटयवधी रूपये ठेवले जातात. यंदा १४ कोटी ३५ लाखांची तरतूद केली आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या कराच्या रूपात हा निधी दिला जातो. गटार, पायवाटा बांधण्यावर हा खर्च केला जातो. परंतु त्याला लागणारा विलंब आणि कामांचा दर्जा पाहता यात भ्रष्टाचार होत असल्याकडे नायक यांनी लक्ष वेधले. कंत्राटदाराला पैसे कामांचा दर्जा तपासून नागरिकांच्या संमती शिवाय देऊ नयेत, अशीही मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)>निर्णय घेईपर्यंत राबवणार मोहीमस्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी माहिती साळुंखे यांनी दिली. सोमवारी स्वाक्षरीचे निवेदन आयुक्त रवींद्रन यांना सादर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढच्या रविवारी डोंबिवली पश्चिमेत ही मोहीम राबविली जाणार आहे. जोपर्यंत आयुक्त निर्णय घेत नाही तोपर्यंत डोंबिवली शहरात हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचे साळुंखे म्हणाले.‘लोकमत’च्या वृत्ताचे कात्रणदरम्यान, दत्तनगर चौकात राबविलेल्या मोहिमेच्या ठिकाणी ‘लोकमत’मध्ये आलेल्या वृत्ताचे कात्रण लावले होते. तेथील सूचना फलकावरील ‘नगरसेवकांचा निधी ठाणेकरांच्या हाती’ हे वृत्त लक्षवेधी ठरले.