शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते बांधकामात प्लास्टिक

By admin | Updated: June 27, 2014 00:32 IST

पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टिक पिशव्या आता रस्ते बांधकामात वापरल्या जात आहेत. तामिळनाडू सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून असे

वसुंधरेचे संरक्षण : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा पुढाकारसंतोष अरसोड -यवतमाळ पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टिक पिशव्या आता रस्ते बांधकामात वापरल्या जात आहेत. तामिळनाडू सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून असे रस्ते बांधण्यात येत आहेत. प्रायोगिक तत्वावर वाशिम जिल्ह्यात १२ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण झाला आहे.भारतात पॉलिइथीलीन, पॉलिप्रापेलिन व पॉलिस्टिरीन प्रकारचे पॉलिमर्स वापरल्या जातात. यातील ५० टक्के प्लास्टिक अत्यंत पातळ असल्यामुळे त्याची वेचणी व रिसायकलिंग होत नाही. परिणामी पर्यावरणासमोर प्लास्टिकचे मोठे आव्हान उभे झाले आहे. आता मात्र प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्ते बांधकाम तंत्रज्ञान विकसित झाले आहे. पातळ प्लास्टिकचा वापर डांबरी रस्त्यात करून रस्त्याचे जीवनमान वाढविण्यासोबत पर्यावरणाचे रक्षणही करण्यात येत आहे. या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्ते बांधकामात होत आहे. पातळ प्लास्टिकला १२० ते १५० डिग्री उष्णतेवर गरम करुन रस्ता बांधकामातील खडीसोबत मिसळून डांबरीकरणात वापरण्यात येत आहे. या खडीमुळे क्षार जमा होण्याची प्रक्रिया मंदावते व खडी खराब होत नाही. यासाठी प्लास्टिक कचऱ्याचे साधारण ४ एमएम आकारापर्यंत तुकडे केले जातात. त्याला विशिष्ट तापमानापर्यंत तापविण्यात येते. हे तुकडे गरम खडीसोबत सोडल्यानंतर अर्ध्या मिनिटात वितळून खडीभोवती पाणी निरोधक आवरण तयार करतात. त्यानंतर त्यात पारंपारिक पद्धतीने डांबर मिसळून रस्ता बांधकामात उपयोग केला जातो.या प्रक्रियेमुळे पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिक नष्ट होण्यास मदत होत असून डांबराची देखील बचत होत आहे. तसेच वातावरणात उत्सर्जित होणाऱ्या कार्बनडॉय आॅक्साईडचीही बचत होत आहे. विशेष म्हणजे प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून एक किलोमीटर रस्ता बांधल्यास एक मेट्रिक टन प्लास्टिकचा लागते तर एक मेट्रिक टन डांबराची बचत होते.