शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अजिंक्यने बनविले भंगारातून ‘रोड क्लीनर’!

By admin | Updated: December 18, 2015 02:04 IST

तब्बल पाच वर्षांनी मिळाले पेटंट !

अकोला : सध्या पुणे येथे उच्चशिक्षण घेत असलेल्या अकोल्याच्या अजिंक्यने इयत्ता दहावीमध्येच तयार केलेल्या 'रोड क्लीनर' यंत्राचं तब्बल पाच वर्षांनी पेटंट देण्यात आले आहे. भंगार वस्तूंपासून तयार केलेल्या रोड क्लीनरच्या यशामुळे अजिंक्यने अकोल्याच्या वैभवात भर टाकली, हे नक्की. अकोल्याचा मूळ रहिवासी अजिंक्य दीपक घुमन हा सध्या पुणे येथे पीव्हीपीआयटी व एस.पी.एम. महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. त्याने नुकतीच राष्ट्रीय पातळीवर पेटंट मिळविण्यासाठी परीक्षा दिली असून, यामध्ये तो उत्तीर्ण झाला आहे. ही परीक्षा त्याने तयार केलेल्या 'रोड क्लीनर' या प्रोजेक्टसाठी दिली होती. या प्रोजेक्टचे पेटंट देण्यात आले असले तरी त्यासाठी त्याला तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. अजिंक्य इयत्ता सातवीमध्ये असताना त्याच्या डोक्यात रोड क्लीनरची संकल्पना आली. शालेय अभ्यासासोबतच त्याने रोड क्लीनर यंत्रासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची जुळवाजुळव चक्क भंगारातून केली. उन्हाळ्य़ाच्या सुट्यांमध्ये त्याने प्रोजेक्टच्या प्रत्यक्ष कृतीला प्रारंभ करून तीन महिन्यांच्या कालावधीत 'रोड क्लीनर'ची छोटेखानी प्रतिकृती तयार केली. हसत-खेळत तयार झालेल्या या प्रतिकृतीला विविध स्तरांवरून बक्षिसे प्राप्त झाली. बक्षीस स्वरूपातून प्राप्त झालेल्या निधीतून त्याने प्रत्यक्षात उपयोगी पडणार्‍या 'रोड क्लीनर'च्या निर्मितीचा ध्यास घेतला. त्याचा याची सुरुवात इयत्ता दहावीच्या सुट्यांमध्ये केली. त्यासाठी पुन्हा भंगारातील साहित्याची खरेदी करून रोड क्लीनरचे मोठे यंत्र तयार केले. हे यंत्र तयार करण्यासाठी त्याला एक वर्षाचा कालावधी लागला. दरम्यान, त्याने फेब्रुवारी २0१५ मध्ये पेटंट मिळविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर परीक्षा दिली होती. नोव्हेंबरमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात अजिंक्यला यश मिळाले.रोड क्लीनर या प्रोजेक्टला नागपुर, पुणे आणि अमरावती येथे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये बक्षीस मिळाले आणि त्याच निधीतून पेटंटची परीक्षा दिली. रोड क्लीनर प्रोजेक्टचं पेटंट मिळाले असून, इतर प्रोजेक्टवरही काम सुरू असल्याचे अजिंक्य घुमन याने सांगीतले. *'रोड क्लीनर' असं करतं कामरस्त्यावरील कचरा उचलणे, रस्ता पाण्याने पुसणे, रस्त्यावरील गवत, लहान झडपं कापणे आदी कामे हे रोड क्लीनर नामक यंत्र करते. साधारणत: एक किलोमीटरकरिता १0 ते १५ मिनिटे अशा वेगाने हे रोड क्लीनर काम करते.*इतर प्रोजेक्टच्या पेटंटसाठी तयारीअजिंक्य घुमनचे रोड क्लीनरसोबतच रोड पॅचर आणि साइड ग्लास क्लीनर या प्रोजेक्टवरही काम सुरू आहे. या प्रोजेक्टचे पेटंट मिळविण्यासाठी अजिंक्य परीक्षेच्या तयारीला लागला आहे.