शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्थेत राजकीय हस्तक्षेपाचा धोका

By admin | Updated: August 13, 2014 02:21 IST

न्यायाधीशांची नेमणूक करण्याची कॉलेजियम पद्धत बाजूला सारत केंद्र सरकारने नवे विधेयक समोर आणले आहे.

धर्मराज हल्लाळे,नांदेड -न्यायाधीशांची नेमणूक करण्याची कॉलेजियम पद्धत बाजूला सारत केंद्र सरकारने नवे विधेयक समोर आणले आहे. प्रस्तावित न्यायिक निवड आयोगातील न्यायव्यवस्थेबाहेरील सदस्यांमुळे राजकीय हस्तक्षेपाचा धोका निर्माण होईल, असा सूर न्यायक्षेत्रातून उमटत आहे. न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची नेमणूक करण्याच्या कॉलेजियम पद्धतीचे समर्थन करीत सरन्यायाधीश न्या. राजेंद्र मल लोढा यांनी न्यायव्यवस्थेला बदनाम करू नये, असे ठणकावले. त्याच संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. पी.बी. सावंत यांनी सांगितले, न्यायाधीश निवडीसाठी स्वतंत्र आयोग आम्हीसुद्धा सुचवला होता. न्यायाधीशांची निवड केवळ न्यायाधीशांनीच करावी हेही योग्य वाटत नाही, परंतु सरकारने प्रस्तावित केलेल्या न्यायिक निवड आयोगात न्यायाधीशांशिवाय नेमले जाणारे सदस्य कायदेतज्ज्ञच असले पाहिजेत. मात्र प्रस्तावित आयोगातील सदस्य हे दोन प्रतिष्ठित व्यक्ती आणि विधिमंत्री असतील एवढेच म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे आणखी एक निवृत्त न्यायायाधीश आणि कर्नाटकचे माजी लोकायुक्त न्या. संतोष हेगडे म्हणाले, कॉलेजियम पद्धतीत त्रुटी असतील, तर त्या सुधाराव्यात. परंतु राजकीय प्रभावामुळे कायद्याचे ज्ञान नसलेल्या व्यक्ती जर न्यायाधीश निवड आयोगाच्या सदस्य झाल्या तर न्यायव्यवस्थेचे घटनात्मक स्वातंत्र्यच धोक्यात येईल. त्यामुळे सध्याची पद्धत सुधारणेसह पुढे सुरू राहिली पाहिजे. घटनाकारांनी न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य स्वतंत्रपणे अधोरेखित केले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याचा डावच सरकारच्या नव्या कायद्याने समोर येत आहे. न्यायाधीशांच्या निवडीत बाहेरच्या व्यक्तींचा समावेश न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण आणणारे, पर्यायाने घटनाविरोधी असल्याचेही हेगडे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती सुजाता मनोहर म्हणाल्या, कॉलेजियम पद्धतीत सुधारणेला वाव आहे. कायद्याचा अभ्यास, आजपर्यंतच्या निकालपत्रांची गुणवत्ता तसेच अनुभव लक्षात घेऊन निवड करणे अपेक्षित आहे. आजच्या कॉलेजियम पद्धतीतही प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे.