शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा रणसंग्राम, कोल्हापूर जोमात, कल्याण डोंबिवलीत वाढता प्रतिसाद

By admin | Updated: November 1, 2015 13:29 IST

सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेतील वाकयुद्धामुळे रंगलेल्या कल्याण डोंबिवली व कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

डोंबिवली/कोल्हापूर, दि. १ -  सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेतील वाकयुद्धामुळे रंगलेल्या कल्याण डोंबिवली व कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. कल्याण डोंबिवलीत ११.३० पर्यंत १८ टक्के तर कोल्हापूरमध्ये १२ पर्यंत ३० टक्के मतदान झाले आहे. 

महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेले वाकयुद्ध गाजले. वाघाचा पंजा, वाघाच्या तोंडातील दात, सरकार तडीपार करण्याचे इशारे अशा अनेक विधानांमुळे वातावरण चांगलेच तापले होते. राज ठाकरे यांनी नाशिकमधील विकास कामांचा हवाला देत मतदारांना साकडे घातले. कोल्हापूरमधील ८१ तर कल्याण डोंबिवलीतील १२२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. रविवारी सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात कल्याण - डोंबिवली आणि कोल्हापूरमध्ये मतदानाला सुरुवात झाली. कोल्हापूरमधील सदर बाजारमध्ये ताराराणीचे उमेदवार आणि अधिका-यांमध्ये वाद झाला होता. उमेदवाराचे प्रतिनिधी येण्यापूर्वीच मतदान यंत्र सुरु केल्याने ताराराणीचे कार्यकर्ते संतापले होते. तर डोंबिवलीतही भाजपा आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे वृत्त आहे. 

कल्याण डोंबिवलीतील २७ गावांमध्येही मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भालेगावमधील ग्रामस्थांनी मात्र बहिष्काराचा पवित्रा कायम ठेवला आहे. मतदार याद्यांमधील घोळामुळे नाव शोधताना मतदारांची तारांबळ झाली आहे. कोल्हापूरमध्ये भाजपा - ताराराणीची युती असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तर कल्याण डोंबिवलीत भाजपा - आरपीआयची युती असून शिवसेना व मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व व काँग्रेसची आघाडीही निवडणुकीत कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.