शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणापायी दंगली घडवल्या जातात - शिवसेना

By admin | Updated: October 11, 2015 11:55 IST

निवडणूक जिंकायची असेल हिंदू - मुस्लिम दंगली घडवायच्या आणि त्या आगीवर राजकीय भाकरी भाजायची हे गणितच बनले आहे असे परखड मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ -  देशात राजकीय कारणासाठी धार्मिक तेढ निर्माण केली जात असून निवडणूक जिंकायची असेल हिंदू - मुस्लिम दंगली घडवायच्या आणि त्या आगीवर राजकीय भाकरी भाजायची हे गणितच बनले आहे असे परखड मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले आहे. दादरीसारख्या घटनांमध्ये कठोर कारवाई करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिली असली तरी मुळात धार्मिक तेढ कोण वाढवतंय असा सवालही त्यांनी भाजपाला उद्देशून विचारला आहे. 

रविवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊत यांनी गोमांस वादावर 'रोखठोक' मतं मांडली आहे. १९९१ मध्ये भाजपाच्या अयोध्या आंदोलनानंतर देश मनाने दुभंगला आणि अजूनही ही दरी रुंदावतच आहे. नोएडीतील दादरी येथे गोमांसच्या वादावरुन एका मुस्लिम तरुणाची झालेली हत्या हे त्याचे उदाहरण आहे. गोमांसाच्या तुकड्यावर देशातील धार्मिक तेढ शिगेला पोहोचली आहे असे राऊत यांनी म्हटले आहे. देशाला नव्या आगीत ढकलणारे हे चित्र असून दादरीतील गोमांस हत्येचा वापर बिहारच्या  निवडणुकीत कसा करता येईल यासाठी सेक्यूलरवाद्यांकडून राजकीय डावपेच आखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मुंबईत जैन धर्मीयांच्या पर्युषणादरम्यान मांसविक्रीवर बंदी टाकण्याची मागणी करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही मागणी केली गेली असे सांगत राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर आझम खान यांनी दादरीप्रकरणानंतर संयुक्त राष्ट्राला केलेली तक्रार हादेखील धार्मिक तेढ वाढवण्याचा भाग आहे अशी टीकाही त्यांनी केली. शेतकरी आत्महत्या करतोय, भ्रष्टाचार, महागाईमुळे माणूसच माणसाला खातोय. यावरुन कोणाचे धर्म खवळत नाही पण गोमांसच्या अफवेवरुन देश दुभंगतो अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.