शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वकील ठरविण्याचा अधिकार पोलिसांना!

By admin | Updated: August 15, 2015 01:10 IST

संवेदनशील व महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायालयात दोषारोप सिद्ध होण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस आयुक्त व अधीक्षकांना विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याचा

- हिनाकौसर खान-पिंजार,  पुणेसंवेदनशील व महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायालयात दोषारोप सिद्ध होण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस आयुक्त व अधीक्षकांना विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे महत्त्वाचे खटले रेंगाळणार नाहीत आणि निपटाराही तातडीने होईल.अनेकदा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने संवेदनशील व महत्त्वाचे खटले असतात. मात्र, सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी त्या खटल्यायोग्य विशेष सरकारी वकिलाची आवश्यकता असते. विशेष सरकारी वकील नेमण्यासाठी शासनाची परवानगी लागते. मात्र या प्रक्रियेत बराच अवधी उलटतो. यामुळे शासनाने हे अधिकार क्षेत्रीय पातळीवर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांनी त्याच्या कार्यक्षेत्रासाठी वकिलांचे पॅनल तयार करावे, असे आदेश आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम २४(८) प्रमाणे संवेदनशील व महत्त्वाचे खटल्यांसाठी या पॅनलमधून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करता येईल.सरसकट कोणत्याही खटल्यासाठी विशेष सरकारी वकील नेमला जाऊ नये, याचीही दक्षता या अध्यादेशात घेण्यात आली आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने संवेदनशील व महत्त्वाचा खटला आहे, याची खातरजमा केल्यानंतरच संबंधित प्राधिकाऱ्याने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावयाची आहे. तसेच, या प्राधिकाऱ्याने दोषारोप सिद्ध होतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावयाचे आहेत, असेही निर्देश आहेत.