शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक धोरणाचा सुधारित अहवाल प्रसिद्ध

By admin | Updated: December 13, 2015 01:01 IST

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातील सुधारित अहवाल राज्य शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिक्षणतज्ज्ञ, तसेच नागरिकांना

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातील सुधारित अहवाल राज्य शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिक्षणतज्ज्ञ, तसेच नागरिकांना १८ डिसेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत या अहवालावर सूचना व अभिप्राय सादर करता येणार आहेत.यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात शिक्षणातील आरक्षण रद्द करण्याची व शाळांचे तास वाढविण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यावर शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसह राजकीय वर्तुळातूनही जोरदार टीका झाली होती. परिणामी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल संकेतस्थळावरून काढून घेण्याचे आदेश दिले, तसेच सुधारित अहवाल प्रसिद्ध केला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार प्रस्ताविक शैक्षणिक धोरणाचा अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अहवालातील कोणत्याही शिफारशीवरून पुन्हा वाद निर्माण होऊ नये, याची काळजी शासनाने घेतली असून, अहवालाच्या प्रत्येक पानावर ‘हा दस्तावेज महाराष्ट्र शासनाचे अधिकृत धोरण अथवा शासन निर्णय नाही’, असे नमूद करण्यात आले आहे. ‘केंद्र शासनाने त्यांच्या वेब पोर्टलवर दिलेल्या मुद्द्यांवर गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर चर्चासत्राद्वारे मते जाणून घेण्यात आली, त्या सूचनांचे संकलन इंग्रजी व मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. या संकलनावर जनतेच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणावर महाराष्ट्र शासनाचा अधिकृत अहवाल तयार करण्यात येईल. त्यानंतर तो केंद्राकडे सादर करण्यात येईल. त्याच प्रमाणे प्रचलित कायदे, भारतीय संविधानातील तरतुदी अथवा न्यायालयीन निर्णयांचे उल्लंघन होईल, अशा कोणत्याही सूचना शासन करणार नाही किंवा स्वीकारणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अहवालावर ँ३३स्र२://६६६.१ी२ीं१ूँ.ल्ली३/१/ठएढटऌ या लिंकवर अभिप्राय सादर करता येईल.