शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल-निवडणूक आयोगात जुंपणार, कर्मचारी न्यायालयात जाणार

By admin | Updated: May 22, 2016 03:42 IST

आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्यांची शिफारस राज्य सरकारला केली

नाशिक : आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्यांची शिफारस राज्य सरकारला केली असून त्यास महसूल यंत्रणेने विरोध केला आहे. बदल्या कायद्याला धरून नसल्याचे सांगत त्याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी महसूल कर्मचारी संघटनेने केली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला नऊ महिने असताना त्यासाठी मे महिन्याच्या अखेरीसच उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या घाईला महसूल अधिकाऱ्यांनी हरकत घेतली आहे. महसूल अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर त्याबाबत बाजू मांडली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम (९) नुसार या निवडणुकांसाठी तहसीलदार किंवा त्यापेक्षा कमी दर्जा असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी तरतूद आहे. त्यामुळे अधिनियमानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या सरसकट बदल्या करणे विधिसंमत नसल्याचा दावा महसूल यंत्रणेने केला आहे.शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंबंधी ३१ मे रोजी सलग तीन वर्षे पूर्ण झालेले अधिकारी बदलीस पात्र असतात, त्यामुळे २८ फेब्रुवारी २०१७ रोजी तीन वर्षे पूर्ण होत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे कायदेशीर तरतुदीस धरून नसल्याचेही महसूल यंत्रणेचे म्हणणे आहे. माहिती मागविलीराज्य आयोगाने मे २०१६ अखेर बदलीस पात्र म्हणजेच एकाच जागेवर तीन वर्षे पूर्ण करणारे अधिकारी, २ फेब्रुवारी २०१७ अखेर एका पदावर तीन वर्षे पूर्ण करणारे व जिल्ह्यात कार्यरत (पदावर तीन वर्षे पूर्ण होत नसतील तरी) उपजिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक करण्यासाठी बदल्या करण्यात याव्यात, अशी शिफारस राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे महसूल विभागाने बदलीस पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मागितली आहे. (प्रतिनिधी)