शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटी रुपयांचा महसूल बुडविला

By admin | Updated: September 23, 2014 01:06 IST

नागपूर सँड ट्रेडिंग कंपनी व वैनगंगा सँड कंपनी यांनी रेतीचे अवैध उत्खनन करून शासनाचा १०० कोटींवर रुपयांचा महसूल बुडविल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने

हायकोर्ट : याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखलनागपूर : नागपूर सँड ट्रेडिंग कंपनी व वैनगंगा सँड कंपनी यांनी रेतीचे अवैध उत्खनन करून शासनाचा १०० कोटींवर रुपयांचा महसूल बुडविल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे.शशिकला गेडाम असे याचिकाकर्तीचे नाव असून, त्या सावनेर तालुक्यातील खापा नगर परिषदेच्या माजी सदस्य आहेत. नागपूर सँड व वैनगंगा सँड या कंपन्यांकडे आठ-नऊ रेतीघाटांचे कंत्राट आहे. पूर्णक्षमतेने रेती काढणे सुरू झाल्यावर खोट्या तक्रारी दाखल करून संबंधित मंत्री किंवा न्यायालयाकडून स्थगनादेश मिळवायचा व त्यानंतर अवैध उत्खनन सुरू ठेवायचे, असा खेळ कंपन्या खेळत आहेत. या गैरव्यवहारात त्यांना शासकीय अधिकारी मदत करीत आहेत. सावनेर तहसीलदारांनी २० मार्च २०१३ रोजी दाखल केलेल्या अहवालानुसार दोन्ही कंपन्यांनी २७ हजार चौरस मीटर रेतीचे अवैध उत्खनन केले आहे. १५ मार्च रोजीच्या पंचनाम्यात एका कंपनीने २६ हजार क्युबिक मीटर रेती चोरल्याचे दिसून आले आहे. करारातील अटींचे उल्लंघन होऊनही दोषींवर काहीच कारवाई झाली नाही, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे.अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी धोरण तयार करण्यात यावे, रेती माफियांच्या बेकायदेशीर व्यवहाराची चौकशी करून निर्धारित वेळेत अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावे, प्रतिवादी कंपन्यांना व्याजासह २ कोटी ३१ हजार रुपये परत करण्यात येऊ नये, दोन्ही कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, २७ हजार क्युबिक मीटर अवैध रेती उत्खनन केल्यामुळे १ कोटी ६० लाख ६६ हजार ४७५ रुपये वसूल करण्यात यावे, अशी याचिकाकर्तीची विनंती आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. मुकेश समर्थ व अ‍ॅड. चंद्रगुप्त समर्थ यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)