शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त पोलिसांना देणार पुरस्कार!

By admin | Updated: December 19, 2015 02:05 IST

माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या नावे फाउंडेशनची स्थापना करून मुंबईत पोलीस कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात फाउंडेशन सेवानिवृत्त

मुंबई : माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या नावे फाउंडेशनची स्थापना करून मुंबईत पोलीस कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात फाउंडेशन सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांपासून ते पोलीस कॉन्स्टेबलपर्यंतच्या तीन पोलिसांना टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या हस्ते ‘पोलीस जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात २३ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता हा सोहळा पार पडेल.इनामदार यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, जिल्हा पोलीस प्रमुख पदांपासून ते पोलीस महासंचालक म्हणजेच आयपीएस अधिकाऱ्यांपैकी १, पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस आयुक्त यांच्यापैकी १ आणि पोलीस कॉन्स्टेबल ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांपैकी १ अशा ३ स्तरांवरील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहेत.यंदाचा पहिलाच पुरस्कार माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग, माजी सहायक पोलीस आयुक्त सॅम पटेल आणि माजी सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील असा तीन स्तरांतील अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. अनुक्रमे १ लाख २५ हजार, १ लाख ११ हजार आणि १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. बुधवारी पार पडणाऱ्या या सोहळ्याला टाटा यांच्यासोबत पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, पोलीस आयुक्त अहमद जावेद आणि सुमारे ५०० आजी-माजी पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.पोलिसांवरील वाढते हल्ले चिंतेची बाबआझाद मैदानापासून विधान भवनापर्यंत पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत इनामदार यांनी चिंता व्यक्त केली. एकट्या पोलिसाला आज समुदायाला हाताळताना भीती वाटत असल्याचे चित्र आहे. ही भीती दूर करताना पोलिसांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.