शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ विक्रेते बंदवर ठाम

By admin | Updated: July 20, 2016 00:23 IST

खरेदीदार व्यापारी आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन यांच्यात आज झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नाही.

पुणे : खरेदीदार व्यापाऱ्यांच्या बंदबाबत खरेदीदार व्यापारी आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन यांच्यात आज झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शहरातील खरेदीदार व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदी न करण्याचा बंद कायम सुरू ठेवला आहे. दरम्यान, मुंबईत पणनमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत बंद मागे घेण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, बंद मिटत नाही तोपर्यंत पुणेकरांना फळभाज्यांसह पालेभाज्या खरेदीसाठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत.राज्य सरकारने शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून आडत वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास विरोध करून आडत ही शेतकऱ्यांकडूनच घ्यावी, या मागणीसाठी खरेदीदारांनी रविवारपासून अचानकपणे खरेदी बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर झालेच आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांनाही भाजीपाला खरेदीसाठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर खरेदीदार व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांची भेट घेतली. खरेदीदारांकडून आडत घेऊ नये अथवा आडत घ्यायची असेल तर शेतकरी आणि खरेदीदार यांच्यात आडत विभागून द्यावी, अशी मागणी खरेदीदारांनी केली. मात्र, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार बाजार समिती प्रशासनाला नसल्याने ही बैठक निर्णयाविनाच संपली.याबाबत मुख्य प्रशासक दिलीप खैरे म्हणाले, उद्या (दि.२०) मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत बाजार समिती प्रशासन खरेदीदारांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत बंद मागे घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यताही असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फु ले मंडई स्वामी समर्थ शेतीमाल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ कासुर्डे म्हणाले, की खरेदीदारांकडून आडत वसुलीमुळे खरेदीदारांसह शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांचे नुकसान होत आहे. यामध्ये कष्टाचा मोबदला फक्त आडते कमवत आहेत. खरेदीदार व्यापारी मार्केट यार्डातून शेतमाल आणणे, मालाची प्रतवारी करणे, विकणे आदी सर्व व्यवहार रोखीने करीत असतो. याशिवाय व्यापाऱ्यांना प्रवासभाडे, गाळाभाडे, वीजबिल आदी खर्चही असतात. तर नियमानुसार ६ टक्के आडत असली तरी आडतदार सेस, लेव्ही आदी करानुसार ती १० ते १२ टक्के आडत वसूल करतात. त्यामुळे आडतदार पद्धतच बंद करावी. आम्हाला आडत्यांची मध्यस्थी नको आहे. शेतकऱ्यांनी महात्मा फुले मंडई येथे शेतमाल आणल्यास शेतकऱ्यांकडून रोख माल खरेदी करण्यात येईल. यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांशी चर्चा झाली आहे. बंदबाबत आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.>मंडईला उपबाजाराचा दर्जा द्यावापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने महात्मा फुले मंडईला उपबाजार म्हणून मान्यता द्यावी. मंडई आवारात येणाऱ्या मालावर सेस भरण्याची येथील व्यापाऱ्यांची तयारी आहे. याचा फायदा सुमारे ७ ते ८ हजार खरेदीदार व्यापाऱ्यांना होणार आहे. शहर आणि परिसरातील २९ शेतीमाल व्यापारी संघटनांची ही मागणी आहे. या मागणीसाठी मुख्यमंत्री पणनमंत्र्यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचेही राजाभाऊ कासुर्डे यांनी सांगितले.