शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

अंड्यावर वाढत्या तापमानाचा परिणाम

By admin | Updated: April 28, 2017 02:40 IST

गेल्या काही वर्षांत वातावरणात अनेक बदल झाले आहेत. त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नैसर्गिक गोष्टींवर झालेला पाहायला मिळतो.

मुंबई : गेल्या काही वर्षांत वातावरणात अनेक बदल झाले आहेत. त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नैसर्गिक गोष्टींवर झालेला पाहायला मिळतो. वाढत्या तापमानामुळे अन्नधान्याचा दर्जा खालावलेला पाहायला मिळतो. याचेच अजून एक उदाहरण म्हणजे सध्याचा चर्चेतला विषय कृत्रिम अंडी. बाजारात कृत्रिम प्लॅस्टिकची अंडी आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यामुळे घबराट पसरली. पण, बाजारात कृत्रिम अंडी आलेली नसून वाढत्या तापमानाचा परिणाम अंड्यावर होत असून, त्यामुळे त्यात बदल झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता, डोंबिवली, भांडुप, विक्रोळी आणि चीनमध्येही कृत्रिम अंडी बाजारात आल्याचे वृत्त पसरले. नेहमीच्या अंड्यापेक्षा ही अंडी वेगळी दिसतात. तसेच ती लवकर फुटत नाहीत, आतला पांढरा आणि पिवळा बलक प्लॅस्टिकसारखा दिसतो. ही अंडी प्लॅस्टिकसारखी दिसत असल्याने बाजारात प्लॅस्टिकची अंडी आली आहेत, या वृत्ताने अनेक जण घाबरले. प्रत्यक्षात मात्र असे अजून सिद्ध झालेले नाही. त्यामुळे ही कृत्रिम अंडी नसून वाढत्या तापमानामुळे अंड्यामध्ये बदल होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (ग्रेटर मुंबई) सुरेश अन्नपुरे यांनी सांगितले. अन्नपुरे यांनी पुढे सांगितले, मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ झालेली आहे. या वाढीचा परिणाम अंड्यावर झालेला असू शकतो. लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण, या वृत्तानंतर एफडीएने मुंबईतून दोन नमुने घेतले आहेत. या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत सुरू आहे. अद्याप अहवाल आलेला नाही. अंड्याचे कवच सच्छिद्र असते, अंड्यामध्ये पोकळी असते. कवचाला असलेल्या छिद्रांमधून बाहेरील हवा अंड्याच्या पोकळीत जाते. हवेमुळे अंड्यातील पांढरा बलक आणि पिवळा बलक यांच्यासह अंड्याच्या आवरणातील पातळ आवरण चिकटते. छिद्र मोठी झाल्यास ही प्रक्रिया वाढते. अंड्यामध्ये प्रोटीन, फॅट असतात. हवा आत गेल्याने हे खराब होऊ शकतात. त्यामुळे हे बलक आणि आवरण चिकटते. यामुळेच अंडी प्लॅस्टिकसदृश दिसू लागतात. एका तज्ज्ञ व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृत्रिम अंडी तयार करण्याची प्रक्रिया इतकी सोपी नाही. तसेच असे अंडे तयार करण्यासाठी येणारा खर्च हा साधारण ५०० ते हजार रुपये इतका येईल. इतकी महाग अंडी विकली जाणार नाहीत. कृत्रिम आणि इतकी महाग अंडी का तयार करण्यात येतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे तापमानवाढीचा परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)