शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानाचा निसर्गावर परिणाम

By admin | Updated: April 19, 2017 00:45 IST

गेल्या सुमारे वीस वर्षांत प्रथमच विक्रमी तापमानाची अनुभूती सध्या रायगडवासीयांना येत असून वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम आता निसर्ग आणि सजीवांवर होताना दिसून येत आहेत

अलिबाग : गेल्या सुमारे वीस वर्षांत प्रथमच विक्रमी तापमानाची अनुभूती सध्या रायगडवासीयांना येत असून वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम आता निसर्ग आणि सजीवांवर होताना दिसून येत आहेत, असा निष्कर्ष भूगोल अभ्यासक तथा पोलादपूर येथील एस.एम.कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.समीर बुटाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. डॉ.बुटाला सातत्याने महाड पोलादपूर परिसरातील वाढत्या तपामानाची नोंद घेवून त्या अनुषंगाने वातावरणातील बदलाचा सातत्यपूर्ण अभ्यास करीत आहेत. मंगळवारी पोलादपूर-महाडमधील दुपारी बारा वाजताचे तापमान ३८ ते ४२ अंश सेल्सिअस इतके आढळले असून, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण २२ टक्के निष्पन्न झाले आहे.वाढत्या तापमानाचे भौगोलिक परिणाम विषद करताना डॉ.बुटाला म्हणाले, अपेक्षित तापमानापेक्षा अधिक तापमान वाढल्याने पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या ‘वातावरण’ नामक आवरणातील अनेक वायू अधिक प्रमाणात प्रसरित होऊन, त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम प्राणिमात्रांसह भूभागावर देखील होतो. तो परिणाम आता हळूहळू दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे विशेष: सह्याद्री रांगातील खडकातील मूलद्रव्ये प्रसरण पावतात, परिणामी खडक फुटतात. याची प्रचिती महाड तालुक्यातील माझेरी घाटातील भूस्खलनानंतर आली आहे. खडकांप्रमाणेच माती, तिच्या उष्णता ग्रहण करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक तापत असल्याने तिच्यातील नैसर्गिक मूलद्रवे ऱ्हास पावतात. मातीमध्ये अनेक सूक्ष्म जीवांचा अधिवास असतो. हे जीव अतिउष्णतेमुळे नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. माणसासह निसर्गातील प्रत्येक सजिवाची कार्यक्षमता त्याच्यामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. शरीरातील पाण्याच्या प्रमाणात घट होत असल्याने कार्यक्षमता कमी होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.वाढते तापमान व हवेत सोडला जाणारा कार्बन डायआॅक्साईड वायू याचा विशिष्ट परिणाम होत आहे. मुळात कार्बन डायआॅक्साईड हा वायू वातावरणावरच्या स्तरावर राहतो व एखाद्या भांड्यासारखी उष्णता वातावरणातील खालच्या थरात थोपवून धरतो त्यामुळे तापमान अधिक वाढते. याचीही प्रचिती सध्या येत असल्याचा निष्कर्ष डॉ.बुटाला यांनी व्यक्त केला आहे. (विशेष प्रतिनिधी)