शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

महिलांवर टिप्पणी करताना निर्बंध घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2016 06:23 IST

महिलांवर टिप्पणी करताना राजकीय पक्षांनी व नेत्यांनी स्वत:वर निर्बंध घालावेत तसेच सभ्यताही बाळगावी, अशा शब्दांत राजकीय नेत्यांची कान टोचणी करत उच्च न्यायालयाने

मुबई : महिलांवर टिप्पणी करताना राजकीय पक्षांनी व नेत्यांनी स्वत:वर निर्बंध घालावेत तसेच सभ्यताही बाळगावी, अशा शब्दांत राजकीय नेत्यांची कान टोचणी करत उच्च न्यायालयाने महिला व बाल कल्याण कल्याण मंत्रालय, न्याय व विधी विभागाला गुरुवारी नोटीस बजावली. राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्ते यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्याकरिता मागदर्शक तत्त्वे आखण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेल्या पुर्णिमा अडवाणी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठापुढे होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी ३० जुलै २०१५ रोजी राजस्थानमध्ये घेतलेल्या जाहीर सभेमध्ये तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांचा उल्लेख ‘पोछा लगानेवाली बाई’ असा केला होता. त्यांनी एका महिलेचा अनादर केला व तिची मानहानीही केली. गुरुदास कामत हे एक उदाहरण झाले. बऱ्याच सभांमध्ये राजकीय नेते किंवा त्यांचे कार्यकर्ते महिलांची मानहानी होईल, अशा शब्दांत तिचा उल्लेख करतात. अशा टिप्पणीमुळे महिलांचा केवळ अनादर होत नाही तर राजकीय क्षेत्रात महिलांनी प्रवेश करू नये, यासाठी त्यांचे खच्चीकरणही करण्यात येते, असे याचिकाकर्तीचे वकील अनुभव घोष यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने यासंदर्भात आपण संसदेला कायदा किंवा नियम करण्याबाबत आदेश देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. ‘आम्ही आदेश देऊ शकलो नाही तरी याबाबत राजकीय पक्ष एकमताने काहीतरी यावर निर्णय घेऊ शकतील. त्यांनी स्वत:वरच निर्बंध घालावेत व सभ्यता बाळगावी. हे केवळ राजकीय नेत्यांना लागू होत नाही तर सर्वसामान्यांनाही यावर विचार करावा,’ असे खंडपीठाने म्हटले. दरवेळी नेते महिलांवर टिप्पणी करतात आणि दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यामांत प्रसिद्ध झाल्यावर ‘आपल्याला त्या अर्थाने बोलायचे नव्हते’ असा पवित्रा घेतात, अशा शब्दांत उच्च न्यायलयाने नेत्यांचे कानही टोचले. (प्रतिनिधी)