धाटाव /रोहा : नवी मुंबई येथे २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात रायगड विशेषत: रोह्यातून किमान ८ हजार मराठा समाज बांधव, भगिनींनी उपस्थित राहण्याचा निर्धार केला आहे. या बैठकीला रोह्यातील खेडोपाड्यांतून मराठा समाज एकवटल्याने बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रविवारी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा.ज्येष्ठ नागरिक सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीची सुरु वात राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करु न झाली. यावेळी विनोद साबळे, रोहा नगराध्यक्ष समीर शेडगे, व्ही. टी. देशमुख, तानाजी देशमुख, नारायण धनवी, विजय मोरे, विनोद पाशिलकर आदींसह पिंगळसई, शेणवई, धाटाव, कोलाड, सुतारवाडी विभागातील व्यापारी, तरुण,ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मराठा समाज सर्वच बाबतीत मागे पडत असून पक्षभेद, मतभेद बाजूला सारून एकजुटीने या मोर्चात सहभागी होऊन मोर्चा अधिक तीव्र करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी के ले.
मराठा क्रांती मोर्चा बैठकीला प्रतिसाद
By admin | Updated: September 20, 2016 03:24 IST