शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील महिलेचा देहदानाचा संकल्प

By admin | Updated: July 10, 2015 02:40 IST

पुरेशी जनजागृती झालेली नसल्याने देहदान करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यात कुपोषणाचा अभिशाप असलेल्या मेळघाटात तर देहदानाचा विचारही कोणाच्या मनाला शिवत नाही.

श्यामकांत पाण्डेय धारणी (जि़ अमरावती) पुरेशी जनजागृती झालेली नसल्याने देहदान करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यात कुपोषणाचा अभिशाप असलेल्या मेळघाटात तर देहदानाचा विचारही कोणाच्या मनाला शिवत नाही. परंतु पतीच्या मृत्यूनंतर सतत मनात घोळणाऱ्या देहदानाच्या इच्छेला कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करून मूर्त रुप देत शोभा इंदरसिंह रंधावा यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला. शोभा रंंधावा यांनी त्यांचे देहदानाचे संकल्पपत्र येथील समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सुपूर्द केले. धारणी शहरातील शोभा रंधावा या देहदान करणाऱ्या मेळघाटातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. २००५ साली त्यांचे पती इंदरसिंह रंधावा यांचे निधन झाले. शहरात त्यांचा आरामशिनचा व्यवसाय होता. पतीच्या निधनानंतर शोभातार्इंच्या मनात देहदानाची इच्छा जागृत झाली. शोभातार्इंनी याचदरम्यान उत्तर प्रदेशातील नैमिषारण्य येथे महर्षी दधिची यांच्या आश्रमाला भेट दिली. दधिची महर्षी यांनी देवलोकाच्या कल्याणासाठी आपल्या हाडांचे दान दिले होते. या कथेने प्रेरित होऊन शोभातार्इंनी देहदानाचा संकल्प केला. दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांनी समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालयात संकल्पपत्र भरले. हा निर्णय घेण्यापूर्वी शोभातार्इंनी आपल्या मुुला-मुलींना याची पूर्वकल्पना दिली. त्यांनीही आईच्या या निर्णयाला समर्थन दिले.