शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात संकल्प महत्त्वाचा

By admin | Updated: September 19, 2014 00:55 IST

एक रुपयाने व्यवसाय सुरू करणाऱ्या धीरुभाई अंबानीनी जगभरात व्यवसायाचा विस्तार केला. शिक्षणाची व्यवस्था नसतानाही अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती बनले. मोहनदास करमचंद गांधी

सुवीरसागर महाराज : श्री सैतवाळ जैन संघटन मंडळाचा उपक्रमनागपूर : एक रुपयाने व्यवसाय सुरू करणाऱ्या धीरुभाई अंबानीनी जगभरात व्यवसायाचा विस्तार केला. शिक्षणाची व्यवस्था नसतानाही अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती बनले. मोहनदास करमचंद गांधी या एका सर्वसामान्य माणसाने इंग्रजाविरोधात लढा उभारून देश स्वतंत्र केला. या सर्व महान व्यक्तींच्या जीवनात एक संकल्प होता. त्यामुळेच हे महान बनले. जो आपल्या जीवनात संकल्प करेल, तो नक्कीच महान बनेल, असे उद्बोधन मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांनी चिटणीस पार्क येथे सुरू असलेल्या प्रवचनमालेत श्रावकांना केले. श्री सैतवाळ जैन संघटन मंडळाच्यावतीने ‘एक और शंखनाद’ या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचनमालेच्या तिसऱ्या दिवशी मुनीश्रींनी ‘संकल्प की आवाज’ यावर उद्बोधन केले. ते म्हणाले की, प्रत्येक माणसाने जीवनात एक ध्येय ठेवावे. ध्येयाबरोबर संकल्प असल्यास, यश नक्कीच पदरात पडेल. आजचे पालक मुलांना सिनेमातील अभिनेते, अभिनेत्रीचे नाव देतात. मात्र पुढे ही मुले पालकांसाठी हीरो नाही झिरो बनतात. मुलांना चांगले संस्कार देणे ही देवाची पूजा आहे. मंदिरात मूर्ती नसली तरी चालेल, मात्र मुलांना मंदिरात जाण्यास शिकवावे, जेणेकरून मानवतेचे मंदिर तयार होईल. या प्रवचनमालेला सुनीलकुमार जैन, सनतकुमार जैन, सुभाष कोटेचा, दयाशंकर तिवारी, कुलभूषण डहाळे, सुरेश आग्रेकर, संतोष जैन, डॉ. विनय रोडे, कमलकांत गोंदवाले, कुणाल गडेकर, नीरज पळसापुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)