शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित जेट्टीला विरोध

By admin | Updated: September 18, 2016 01:51 IST

सर्वोदय विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने शनिवारी पर्यावरण विषयक जनसुनावणी सकाळी 11 वाजता ठेवली होती.

रोहा : इंडो एनर्जी इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीच्या नवीन प्रस्तावित कोर्लई जेट्टी व सानेगाव येथील विस्तारीत जेट्टी संदर्भात सुडकोली येथे सर्वोदय विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने शनिवारी पर्यावरण विषयक जनसुनावणी सकाळी 11 वाजता ठेवली होती. सानेगाव व कोर्लई येथील ग्रामस्थांनी जनसुनावणीला विरोध करीत ती उधळून लावली. त्यामुळे जनसुनावणी स्थगित करण्यात आली. यावेळी रोहा प्रांताधिकारी, प्रदूषध मंडळाचे अधिकारी, ग्रामस्थ हजर होते.इंडो एनर्जी इंटरनॅशनल लि. मार्फत कोळसा प्रकल्प सानेगाव येथे असून याठिकाणी जेट्टी उभारलेली आहे. मात्र या जेट्टीचा विस्तार करण्यात येत आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई येथेही कंपनीची नवीन जेट्टी होणार असून शनिवारी सुडकोली गावात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ग्रामस्थांची जनसुनावणी ठेवली होती. या सुनावणीला सानेगाव व कोर्लई ग्रामस्थांनी विरोध केला असून ज्या ठिकाणी प्रकल्प होणार आहे, त्या गावात सुनावणी ठेवावी यासाठी ग्रामस्थ आग्रही होते.कोर्लई येथे होणाऱ्या नवीन जेट्टीमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा येणार आहे. कोळसा प्रकल्पाने मासेमारी व्यवसायावरही परिणाम होणार आहे. कंपनीने चुकीचा प्रकल्प शासनाकडे सादर केल्याचा आरोप शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी केला आहे. प्रकल्पाने शेताचे नुकसान होईल, त्याचबरोबर ऐतिहासिक कोर्लई किल्ला, अगोरकोट किल्ला या वास्तुंनाही कोळसा प्रदूषणाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. मात्र सुडकोलीतील जनसुनावणी वेळी प्रांताधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले त्यामुळे या जनसुनावणीला स्थगिती देण्यात आली.