शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रहिवासी आले रस्त्यावर

By admin | Updated: April 6, 2017 02:21 IST

गेल्या दहा वर्षांपासून चेंबूरच्या वाशी नाका परिसरात एका खासगी विकासकाकडून एसआरए प्रकल्प सुरू आहे.

मुंबई : गेल्या दहा वर्षांपासून चेंबूरच्या वाशी नाका परिसरात एका खासगी विकासकाकडून एसआरए प्रकल्प सुरू आहे. मात्र, झोपड्या तोडून दहा वर्षे उलटूनही विकासकाकडून इमारतींचा पायादेखील खोदला जात नसल्याने, संतापलेल्या रहिवाशांनी बुधवारपासून वाशीनाका परिसरात विकासकाविरुद्ध उपोषण सुरू केले. २००७ पासून वाशी नाका परिसरातील ओम गणेशनगर आणि अशोकनगर या परिसरात विकासकाकाडून एसआरए प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, गेल्या काही वर्षांत या परिसरातील अडीच हजार झोपड्या विकासकाने जमीनदोस्त केल्या. या सर्व झोपडीधारकांना विकासकाने महिन्याचे भाडे ठरवले होते. त्यानुसार, यातील अनेक जण गावी स्थायिक झाले, तर काही लोक चेंबूर परिसरातच वास्तव्यास आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून या विकासकाने या झोपडीधारकांना घरभाडेही दिले नाही. त्यामुळे अनेकांवर भाड्याची खोली सोडून रस्त्यावर राहाण्याची वेळ आली आहे. याबाबत विकासकासोबत अनेकदा बैठका घेऊनदेखील तोडगा निघत नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे.त्यामुळे १० वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्पदेखील तत्काळ पूर्ण करावा, यासाठी रहिवाशांनी विकासकाकडे तगादा लावला. मात्र, विकासकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. संतापलेल्या रहिवाशांनी या परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे़ विकासकाकडून वर्षाचे घरभाडे आणि इतर मागण्यांची पूर्तता केली जात नाही, तोपर्यंत रहिवासी उपोषण सुरूच ठेवणार आहेत. (प्रतिनिधी)२००७ पासून वाशी नाका परिसरातील ओम गणेशनगर आणि अशोकनगर या परिसरात विकासकाकाडून एसआरए प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, गेल्या काही वर्षांत या परिसरातील अडीच हजार झोपड्या जमीनदोस्त केल्या.