शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही

By admin | Updated: July 21, 2014 23:04 IST

आतार्पयत राज्य शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. फक्त निवडणुकापुरता वापर केला. आश्वासने दिली

बारामती : आतार्पयत राज्य शासनाने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. फक्त निवडणुकापुरता वापर केला. आश्वासने दिली. राज्य घटनेतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तरतूद केली आहे. परंतु, ‘धनगर’ आणि ‘धनगड’ अशा शब्दोच्चाराचा गैरफायदा घेऊन समाजाला विकासापासून वंचित ठेवले आहे. आता आरक्षणाचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा सूर आजच्या निर्धारसभेत प्रमुख नेत्यांनी लावला. 
 बारामती येथे झालेल्या निर्धार सभे बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे  म्हणाल्या, ‘‘ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. केंद्र शासनाच्या स्तरावर येणा:या सर्व अडचणी दूर करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’’
राष्ट्रीय समाजपक्षाचे नेते महादेव जानकर म्हणाले, ‘‘ या समाजाच्या नेत्यांना दुय्यम दर्जाची पदे दिली. त्यांच्याकडून मते घेतली. मात्र धनगर समाजाला विकासापासून दूर ठेवले.’’  जानकर यांनी विविध पक्षात काम करणा:या समाजातील नेत्यांवर देखील जोरदार टिका केली. दबाव आणल्याशिवाय आरक्षणाचा मुद्दा निकाली लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.
 ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी आरक्षणाच्या मुद्दय़ावर नेहमी दुटप्पी भूमिका सरकारने घेतल्याचे सांगितले. 
कृती समितीचे नेते बाळासाहेब गावडे म्हणाले, ‘‘  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेतच आरक्षणाची तरतूद केली. परंतु, जाणीवपूर्वक त्याची अंमलबजावणी याच राज्यात झाली नाही. 6क् वर्षापासून शब्दोच्चाराचा फायदा घेतला.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 8 दिवसाची मुदत मागितली आहे. 24 जुलैर्पयत त्यांना मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र फसवणूक झाल्यास कार्यकर्ते उग्र आंदोलन करतील. त्याची जबाबदारी राज्य शासनावर राहील, असा इशारा दिला. 
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, आमदार राम शिंदे, आमदार प्रकाश शेंडगे, डॉ. विकास महात्मे, आमदार रामदास वडकुते, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भरणो यांची भाषणो झाली.
 कृती समितीचे नेते हनुमंत सूळ यांनी 25 जुलैर्पयत धरणो आंदोलन, उपोषणाचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर पुढील दिशा ठरणार असल्याचे सांगितले.
 
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नाव घेण्यास विरोध..
4या सभेत धनगर आरक्षणाचाच मुद्दा महत्त्वाचा ठरला. आमदार अनिल गोटे यांनी अन्य राजकीय विषयाला हात घातला. मात्र, कार्यकत्र्यानी त्यांचे भाषण बंद पाडले. 
4पुणो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणो यांनी भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा गुणगौरव करण्याचा प्रयत्न करताच उपस्थित तरुणांनी ‘या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचे नाव घ्यायचे नाही ’ असे सांगून त्यांचे भाषण बंद पाडले. 
4भरणो यांनी अखेर त्यांचे शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त केली. तेव्हा पुढे भाषण करण्यास संधी दिली. 
 
बारामतीत लाखोंच्या संख्येने धनगर बांधव
बारामतीत निर्धार सभेच्या निमित्ताने राज्यभरातून 2 लाखांहून अधिक जनसमूदाय उपस्थित राहिला. शहरातील इंदापूर चौकाला अहिल्यादेवी चौक असे नामकरण करण्यात आले. 
 
काटेवाडीत मेंढय़ांचे रिंगण..
आरक्षण दिंडी भवानीनगर वरून बारामतीकडे येताना काटेवाडीत अहिल्यादेवींच्या रथाभोवती मेंढय़ांचे वैशिष्टय़पुर्ण रिंगण पार पडले. आरक्षण दिंडीने सकाळी भवानीनगर येथून बारामतीकडे प्रस्थान केले.