शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनातून पावणेचार कोटींचा महसूल

By admin | Updated: October 31, 2014 00:52 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये फारशा सोयीसुविधा नसल्याची नेहमीच ओरड होते. ही बाब काही अंशी खरी असली तरी संशोधनाच्या बाबतीत अनेक विभागांनी कात

नागपूर विद्यापीठ : पदव्युत्तर विभाग टाकताहेत कातनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये फारशा सोयीसुविधा नसल्याची नेहमीच ओरड होते. ही बाब काही अंशी खरी असली तरी संशोधनाच्या बाबतीत अनेक विभागांनी कात टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन वर्षांत संशोधन तसेच ‘कन्सल्टन्सी’च्या रूपात काम करताना पदव्युत्तर विभागांनी सुमारे पावणेचार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केल्याची बाब समोर आली आहे. औषधीविज्ञान शास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद येवले यांनी विचारलेल्या प्रश्नांवर विद्यापीठ प्रशासनाने ही माहिती सादर केली आहे.विद्यापीठाच्या निरनिराळ््या पदव्युत्तर विभागांमध्ये संशोधन प्रकल्प चालतात. यासोबतच उद्योगक्षेत्रातील काही कंपन्यांसाठी तसेच विभागांसाठी ‘कन्सल्टन्सी’ म्हणूनदेखील काम पाहिल्या जाते. या माध्यमातून विभागांना महसूल प्राप्त होतो. २०११-१२ या सालात संशोधनाच्या माध्यमातून १ कोटी ७३ लाख १९ हजार ९०० रुपये इतका महसूल प्राप्त झाला होता. २०१२-१३ मध्ये हाच आकडा १ कोटी २७ लाख ८५ हजार ७०० इतका होता. २०१३-१४ मध्ये मात्र महसूल कमी झाल्याचे दिसून आले असून वर्षभरात ६९ लाख १४ हजार ५३२ रुपयेच महसूल प्राप्त झाला. संशोधनाच्या बाबतीत विज्ञानशास्त्राशी संबंधित विभागांनी आघाडी घेतली आहे. (प्रतिनिधी)पाच वर्षांत सहा सामंजस्य करारविद्यापीठातील विभागांचा उद्योगक्षेत्राशी थेट संपर्क यावा व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक जगतातील कामांचे स्वरूप जवळून जाणता यावे यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षात विद्यापीठाने औद्योगिक संस्था, संशोधन संस्था, इतर विद्यापीठे असे मिळून सहा सामंजस्य करार केले आहेत. यात ‘नीरी’, ‘अ‍ॅनॅकॉन लॅब’, ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ कॉटन रिसर्च’, ‘एमसीईडी’ (महाराष्ट्र सेंटर फॉर एन्टरप्रेनरशीप डेव्हलपमेन्ट), देव संस्कृत विद्यापीठ, ‘झिम लॅब लिमिटेड’ यांचा समावेश आहे. तीन वर्षांत ४८ संशोधन प्रकल्पविद्यापीठाच्या निरनिराळ््या विभागांमध्ये मिळून गेल्या तीन वर्षांत ४८ संशोधन प्रकल्प चालविण्यात आले. तर निरनिराळ््या विषयांवरील सहा कार्यशाळा घेण्यात आल्या. पेटेंटच्या बाबतीत मात्र अजूनही फारसा उत्साह दिसत नसून गेल्या तीन वर्षांत केवळ तीन पेटेंट झाले असल्याची माहिती विद्यापीठाने सादर केली आहे.