शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी १५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल

By admin | Updated: January 12, 2015 03:16 IST

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीच्या व दीर्घकालीन कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, यासंंबंधी सविस्तर अहवाल

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीच्या व दीर्घकालीन कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, यासंंबंधी सविस्तर अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याची सूचना विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी रविवारी झालेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली.संबंधित अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात सादर करायचा आहे. नदीचा पर्यावरणीय अभ्यास करणाऱ्या ‘निरी’ संस्थेने प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या शिफारशी उच्च न्यायालयाने स्वीकारल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नदीच्या प्रदूषणप्रश्नी जाणीव जागृती, तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेली उपसमिती, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी नगरपालिका यांनी तयार केलेल्या कृती आराखड्याचा चोक्कलिंगम यांनी आढावा घेतला. नदीत जनावरे, कपडे, वाहने धुता येणार नाहीत. निर्माल्य, रक्षाविसर्जन करता येणार नाही, यासाठी गावालगत नदीकाठावर बॅरेकेटस् उभारावेत. प्रदूषण रोखण्यासाठी रहिवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. इचलकरंजी व कोल्हापूरमध्ये प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांवर कारवाई करावी. साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी नदीत येऊ नये, यासाठी कायमस्वरूपी योजना हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. ३९ गावांचे सांडपाणी नदीत मिसळू नये यासाठी तातडीने प्रक्रिया प्रकल्प उभारावेत. प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)