शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘एलिव्हेटेड’चा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 05:26 IST

पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते विरार आणि मध्य रेल्वेच्या हार्बरवरील सीएसटी ते पनवेल एलिव्हेटेड (उन्नत)प्रकल्प ट्रॅकवर येण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते विरार आणि मध्य रेल्वेच्या हार्बरवरील सीएसटी ते पनवेल एलिव्हेटेड (उन्नत)प्रकल्प ट्रॅकवर येण्यास सुरुवात झाली आहे. या दोन्ही प्रकल्पांचे प्राथमिक अहवाल एमआरव्हीसीने एक आठवड्यापूर्वीच रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सादर केले आहेत. त्या अहवालावर रेल्वे आणि राज्य सरकारकडून लवकरच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा एमआरव्हीसीने व्यक्त केली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत मुंबई रेल्वेच्या विविध प्रकल्पांवर चर्चा केली. या वेळी चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. यात प्रथम वांद्रे ते विरार आणि त्यानंतर वांद्रे ते चर्चगेट प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर, सीएसटी ते पनवेल रेल्वे आणि रोड असा मल्टिमॉडल एलिव्हेटेड कॉरिडोरही बांधण्यात येणार असून, त्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली होती. दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्प एमआरव्हीसीच्या अखत्यारित येत असल्याने, त्यांनी या प्रकल्पांचे सुधारित प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्पांचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे एक आठवड्यापूर्वी पाठवण्यात आल्याची माहिती एमआरव्हीसीचे प्रवक्ता प्रभात रंजन यांनी दिली. (प्रतिनिधी)>वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मोठ्या प्रमाणात खासगी व सरकारी कार्यालये उभे राहात आहेत. त्यामुळे वांद्रे येथून एलिव्हेटेड प्रकल्प बनविण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे.