शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्वात नसलेल्या पदावर बदली

By admin | Updated: October 17, 2016 04:29 IST

पोलीस दलाच्या कार्यपद्धतीचे नियोजन व संचालन करण्यासाठी कार्यरत असलेल्या गृहविभागाच्या वेंधळेपणाचे अजब उदाहरण चव्हाट्यावर आले

जमीर काझी,

मुंबई- पोलीस दलाच्या कार्यपद्धतीचे नियोजन व संचालन करण्यासाठी कार्यरत असलेल्या गृहविभागाच्या वेंधळेपणाचे अजब उदाहरण चव्हाट्यावर आले आहे. अप्पर पोलीस महासंचालक एस. एन. पांडे यांची अस्तित्वातच नसलेल्या पदावर प्रतिनियुक्तीवर बदली करण्याचा प्रकार घडला आहे. तब्बल दीड महिन्यानंतर ही चूक लक्षात आल्यानंतर, संबंधित आदेश बदलण्याची उपरती विभागाला झाली.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या संचालकपदी अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची गेल्या काही वर्षांपासून प्रतिनियुक्ती नेमणूक केली जाते. तिन्ही कंंपन्यांमधील गैरव्यवहार वीजचोरीला प्रतिबंध, कारवाई व सुरक्षा याबाबतचे नियोजन व प्रभारी म्हणून ते कार्यरत असतात. गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत असलेले सूर्यप्रकाश गुप्ता हे ३० जुलैला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर, एक महिना हे पद रिक्त होते. त्या पदावर गेल्या १ सप्टेंबरला राज्य पोलीस दलातील महामार्ग वाहतूक नियंत्रण (हायवे ट्रॅफिक) विभागाचे प्रमुख अप्पर महासंचालक एस. एन. पांडे यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. मात्र, त्याबाबतचा आदेश काढताना गृहविभागाने विद्युत मंडळाच्या संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) असे न काढता, सध्या अस्तित्वात नसलेल्या मुख्य दक्षता अधिकारी राज्य विद्युत कंपनी असे काढले. विशेष म्हणजे, अप्पर महासंचालकांचा दर्जा हा मुख्य दक्षता अधिकाऱ्यापेक्षा वरचा असल्याने त्याबाबत संभ्रम झाला. दोन वर्षांपूर्वीपासून त्याऐवजी संचालक या पदाची निर्मिती करण्यात आलेली होती. मात्र, गृहविभागाच्या कक्ष-१ च्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत पूर्ण माहिती न घेता, एस. एन. पांडे यांची अप्पर महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी अशा पदावर बदली केली. पांडे यांनी त्याबाबत गृहविभागाला कळविल्यानंतर, अधिकाऱ्यांच्या लक्षात ही चूक आली. >आदेश काढताना चूक१ सप्टेंबरला राज्य पोलीस दलातील महामार्ग वाहतूक नियंत्रण (हायवे ट्रॅफिक) विभागाचे प्रमुख अप्पर महासंचालक एस. एन. पांडे यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. मात्र, त्याबाबतचा आदेश काढताना गृहविभागाने विद्युत मंडळाच्या संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) असे न काढता, सध्या अस्तित्वात नसलेल्या मुख्य दक्षता अधिकारी राज्य विद्युत कंपनी असे काढले.