शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन घाटाच्या दुरुस्ती कामाला वेग

By admin | Updated: September 5, 2016 01:49 IST

गणेश विसर्जन घाटाची महानगरपालिका प्रशासनाच्या स्थापत्य विभागाकडून दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले

रावेत : येथील गणेश विसर्जन घाटाची महानगरपालिका प्रशासनाच्या स्थापत्य विभागाकडून दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पवना नदीकाठी असलेल्या या गणपती विसर्जन घाटाची दुरवस्थेची दखल घेत दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे साहित्य घाटावर उपलब्ध करून डागडुजीच्या कामला सुरुवात केली आहे.दर वर्षी जाधव घाटावर रावेत, वाल्हेकरवाडी, प्राधिकरण, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर आदी भागातील सार्वजनिक गणपती मंडळे व घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते. महापालिकेने केलेल्या दुरुस्तीमुळे आता दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सुद्धा हा घाट गणेशभक्तांसाठी उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे पालिकेच्या आरोग्य विभागानेही गणपती विसर्जन घाटाची साफसफाई केली आहे. या घाटावर वाढलेले गवत व घाटावर पावसामुळे नदी प्रवाहाबरोबर आलेला गाळ साफ करण्यात आला आहे.नदीपात्रात गणपती विसर्जनामुळे नदीचे पाणी दूषित होते. त्यामुळे नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन न करता स्मशानभूमी घाटावर गणपती विसर्जनासाठी हौदाची सोय करण्यात आली आहे. या हौदामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करावे यासाठी महापालिका प्रशासन, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पर्यावरणवादी संघटना नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. त्यामध्ये नागरिकांनी पुन्हा कचरा टाकून अस्वच्छ करू नये, म्हणून लोखंडी झाकण बसवून तात्पुरते बंद करून ठेवण्यात आले. गणेश मंडळांना गणपती विसर्जनासाठी रात्री उशीर झाल्यास त्यांच्या सोईसाठी घाटावर विद्युत दिवे लावण्यात आले आहे. गणेश विसर्जन घाटाचे काम वेळेत पूर्ण झाल्याने रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.या भागात महाविद्यालयीन तरुणांकडून ज्या भागात गणेश विसर्जनाची सोय करण्यात येते, त्या ठिकाणी विसर्जन न करता नदीपात्राच्या इतर भागात विसर्जन केले जाते. या वर्षी अशा बेजबाबदार मंडळांकडे प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहेत. (वार्ताहर)>प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनानदीमधील प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इको फ्रें डली गणेश विसर्जन अर्थात पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने बांधण्यात आला आहे. हौद एकच असल्यामुळे तेथे गणेश विसर्जन करण्यासाठी गर्दी होत असते. वाढता प्रतिसाद पाहता आणखी एका हौदाची निर्मिती आवश्यक आहे. पर्यावरणाभिमुख परिसराची रचना करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी यासाठी महापालिका अनेक उपाययोजना करीत असून गेल्या दोन वर्षांपासून रावेत मधील विसर्जन घाटामध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे.>विसर्जनासाठी सुसज्ज नदी घाटया ठिकाणी छोट्या गणेश मूर्तींबरोबरच पाच फूट आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. घाटाचे प्रत्येक वर्षी सपाटीकरण करण्यासाठी पैसे खर्च केले जातात. त्याऐवजी येथील घाटाचे सुसज्ज पायऱ्यांसह बांधकाम करणे आवश्यक आहे. गणेश विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांना आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून सर्व बाजूनी प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. काही अंतरावर सुरक्षतेच्या दृष्टीने लाकडी बॅरिकेट उभारण्यात येणार आहे. निर्माल्य इतरत्र अथवा नदीपात्रात फेकू नये याकरिता पालिकेच्या वतीने दक्षता घेण्यात येणार आहे. >‘‘घाटावर गणेश भक्तांसाठी आरती स्थाने आणि निर्माल्यकलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल, गणेश भक्तांच्या वाहनासाठी वाहन तळ, पाणबुडी पथक, अग्निशामक दल, प्रखर विद्युतव्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.’’- मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक