शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दंगामस्ती करणाऱ्या मुलांच्या पालकांना दिलासा

By admin | Updated: November 16, 2015 02:56 IST

‘मुले अभ्यास करत नाही’, ‘शाळेत मस्ती करतात’, ‘मुले उगाचच चिडचिड करतात’ अशा अनेक समस्यांनी अनेकदा पालक हैराण झाल्याचे आपण पाहतो.

पूजा दामले, मुंबई‘मुले अभ्यास करत नाही’, ‘शाळेत मस्ती करतात’, ‘मुले उगाचच चिडचिड करतात’ अशा अनेक समस्यांनी अनेकदा पालक हैराण झाल्याचे आपण पाहतो. अनेक वेळा समजावूनसुद्धा ही मुले ऐकत नाहीत. त्यामुळे आता नेमके काय करायचे? असा प्रश्न पालकांसमोर असतो. पाल्यांमुळे त्रस्त पालकांसाठी मुंबईत एक खास ‘हेल्पलाइन’ सुरूकरण्यात आली आहे. या हेल्पलाइनद्वारे पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन आता विभक्त कुटुंबेच दिसून येतात. त्यामुळे अनेक पालकांना मुलांच्या समस्या सोडवताना नाकीनऊ येतात. त्यांना योग्य पर्यायदेखील मिळत नाही. पर्यायाने पालक आणि मुलांमधील संवादात दरी निर्माण होत जाते. या सर्वांवर पर्याय म्हणून पालकांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचे ‘परिसर आशा’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सवूर यांनी सांगितले.अभ्यास करणारा मुलगा किंवा मुलगी अचानक अभ्यास करेनाशी होते. एखादी गोष्ट मिळाली नाही, तर ही मुले चिडचिड करतात. अशा वेळी पालकांना मुलांशी कसे वागावे, हे समजत नाही, पण अजूनही अशा प्रश्नांसाठी मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे पालक टाळतात. हा पर्याय सहसा निवडला जात नाही. पाल्यामुळे त्रस्त असलेल्या पालकांना आधार म्हणून पालकांसाठी ही खास हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. शिक्षक दिनापासून ही हेल्पलाइन प्रायोगिक तत्त्वावर सुरूकरण्यात आली असून, आत्तापर्यंत ६० ते ६५ कॉल्स हेल्पलाइनवर आल्याचे आरती यांनी सांगितले. अनेकदा पालकांना समोरासमोर बोलणे शक्य नसते, वेळेच्याही मर्यादा असतात, पण फोनवर पालकांची ओळख उघड होत नाही. त्यामुळे पालक फोनवर दिलखुलासपणे बोलतात. सगळ््या समस्या सविस्तरपणे सांगतात. मग फोनवरच पालकांचे समुपदेशन केले जाते, पालकांना मार्गदर्शनही केले जाते, पण प्रश्न खूपच जटिल असल्यास पालकांना कार्यालयात बोलावून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येते. याद्वारे पालकांना नवीन दिशा मिळते, असे आरती यांचे म्हणणे आहे.