शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

असीफ बलवासह सात जणांना दिलासा

By admin | Updated: May 18, 2016 04:58 IST

८७० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने बलवा ग्रुपचे असीफ बलवा व अन्य सहा जणांना मंगळवारी अंतरिम दिलासा दिला.

मुंबई : ८७० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने बलवा ग्रुपचे असीफ बलवा व अन्य सहा जणांना मंगळवारी अंतरिम दिलासा दिला. उच्च न्यायालयाने या सातही जणांना २५ मेपर्यंत अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. या घोटाळ््यात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ आरोपी आहेत. विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी पंकज भुजबळ यांच्यासह ३४ जणांवर अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. अटक होईल, या भीतीने सात जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बलवा ग्रुपचे असीफ बलवा, संजीव जैन, प्रवीण जैन, चंद्रकांत सारडा, जगदीश पुरोहित, राजेश मिस्त्री व विपुल करकारिया यांनी अटकपूर्व जामिनासाठी व अजामीनपात्र वॉरंटवर स्थगिती मिळवण्याकरिता उच्च न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी या याचिकांवर सुनावणी होती.‘सहआरोपी के. एस. चमणकर याला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे सर्व आरोपींना सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ येऊ देऊ नये. उच्च न्यायालयानेच निर्णय घ्यावा,’ असा युक्तिवाद सर्व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला, तर सरकारी वकिलांनी यावर आक्षेप घेतला. ‘पीएमएलए कलम ४५ अंतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपींना जामीन दिला जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयानेच तसे स्पष्ट केले आहे,’ असा युक्तिवाद सरकारतर्फे अ‍ॅड. पूर्णिमा कंथारिया यांनी केला. न्या. अजय गडकरी यांनी असीफ बलवा याच्यासह सात जणांना अंतरिम दिलासा दिला. (प्रतिनिधी)