शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पंकज भुजबळ यांना १० जूनपर्यंत दिलासा

By admin | Updated: June 8, 2016 03:39 IST

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी पंकज भुजबळ व अन्य १० जणांना मंगळवारी उच्च न्यायालयाने १० जूनपर्यंत अंतरिम दिलासा दिला.

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी पंकज भुजबळ व अन्य १० जणांना मंगळवारी उच्च न्यायालयाने १० जूनपर्यंत अंतरिम दिलासा दिला. त्यामुळे १० जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या सर्वांना अटक करू शकत नाही. विशेष पीएलएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने २७ एप्रिल रोजी पंकज भुजबळ यांच्यासह ४३ जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या वॉरंटला पंकज भुजबळ, असिफ बलवा आणि विनोद गोयंका यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. तर अन्य ११ आरोपींनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. अजामीनपात्र वॉरंटला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती. या याचिकांवर सुनावणी घेण्याचा अधिकार एकसदस्यीय खंडपीठाला नाही, असे म्हणत न्या. जाधव यांनी पंकजसह अन्य आरोपींना द्विसदस्यीय खंडपीठापुढे याचिका सादर करण्यासाठी १० जूनपर्यंत मुदत दिली. तोपर्यंत या सर्व आरोपींना अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले. (प्रतिनिधी) >१ जुलैपर्यंत अटक नाहीअटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्यासह ११ आरोपींना १ जुलैपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने दिले.प्रवीण जैन, संजीव जैन, चंद्रशेखर सारडा, जगदीश प्रसाद पुरोहित, बिमलकुमार जैन, संजय काकडे, कपिल पुरी, राजेश मिस्त्री, विपुल कांकरिया, शैलेश मेहता व सुरेश जाजोदिया यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे होती.