शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

‘आयजीएम’च्या कर्मचाऱ्यांना दिलासा

By admin | Updated: April 9, 2017 03:37 IST

इचलकरंजीच्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयाचे (आयजीएम) हस्तांतरण राज्य सरकारकडे केल्यानंतर सरकारने नगर परिषदेने १९९९मध्ये भरती केलेल्या ५४ कर्मचाऱ्यांच्या

मुंबई : इचलकरंजीच्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयाचे (आयजीएम) हस्तांतरण राज्य सरकारकडे केल्यानंतर सरकारने नगर परिषदेने १९९९मध्ये भरती केलेल्या ५४ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीस मंजुरी दिली नाही. मात्र उच्च न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना सध्या ते ज्या पदावर कार्यरत आहेत, त्याच पदावर आर्थिक लाभासह ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. इचलकरंजी नगर परिषदेतर्फे चालवण्यात येणाऱ्या आयजीएम रुग्णालयाचा कारभार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला. रुग्णालयाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. रुग्णालयाबरोबरच कर्मचारीही राज्य सरकारला वर्ग करण्यात आले आहेत. एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५४ कर्मचाऱ्यांना वर्ग करून घेण्यास सरकारने नकार दिला. या कर्मचाऱ्यांची मूळ भरती कायद्यानुसार झाली नसल्याने २०१२मध्येही राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीस परवानगी देण्यास नकार दिला होता. मात्र नगरपालिकेने स्वत:च्या जबाबदारीवर त्यांना कामावर कायम केले. त्यानंतर स्थानिक नेत्यांनीही या कर्मचाऱ्यांना नोकरीवर कायम करण्याचे आश्वासन दिले होते.अखेरीस रुग्णालय हस्तांतरणाच्या वेळी राज्य सरकारने संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवण्यास नकार दिला. या निर्णयाला रुग्णालयाच्या नर्स स्वाती बारवाडे यांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्या. अनुप मोहता व न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठापुढे होती. स्वाती बारवाडे या १९९९ पासून नर्स म्हणून रुग्णालयात काम करत आहेत. या पदाचे सर्व आर्थिक लाभ त्यांना मिळत आहेत. इतकी वर्षे काम केल्यानंतर आता तुमच्या नियुक्तीलाच मंजुरी नसल्याचे कारण देत कामावरून कमी करण्याची राज्य शासनाची कृती बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद सुतार यांनी केला. त्यावर खंडपीठाने राज्य सरकारला त्यांना कामावरून कमी करण्यास मनाई करत त्याच पदावर पूर्ण आर्थिक लाभासह कामावर ठेवावे, असा अंतरिम आदेश देत याचिकेवर ४ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)