शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शासकीय सेवेतील कोळी कर्मचाऱ्यांना दिलासा

By admin | Updated: August 24, 2015 01:17 IST

जातवैधता प्रमाणपत्र सादर न करु शकलेल्या कोळी समाजातील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून तूर्तास निलंबित करु नये, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत

मुंबई : जातवैधता प्रमाणपत्र सादर न करु शकलेल्या कोळी समाजातील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून तूर्तास निलंबित करु नये, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याचा लाभ शासकीय व निमशासकीय सेवेतील कोळी समाजाच्या सुमारे २० हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.जातवैधता प्रमाणपत्र नसलेल्या कोळी समाजातील कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात येऊ नये तसेच याबाबत निर्णय घेण्यासाठी संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अलीकडेच केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अशा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाला तात्पुरती स्थगिती दिली, असे शेलार यांनी सांगितले.शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या असे निदर्शनास आणले की, शासकीय आणि निमशासकीय सेवेतील काही कर्मचाऱ्यांना अनुसूचित जातींमधून तर काहीजणांना विशेष मागास प्रवर्गातून शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ते न दिल्यास त्यांना निलंबित केले जाण्याची भीती आहे. कोळी समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करावा याकरिता कोळी महासंघातर्फे गेली २० वर्षे लढा सुरु आहे. याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात येऊ नये, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, युवा अध्यक्ष चेतन पाटील, माजी नगरसेवक विलास चावरी आदींचा समावेश होता. (विशेष प्रतिनिधी)